पुण्यातून अरुण लाड, जयंत आसगावकर आघाडीवर 

सुरुवातीच्या कलानुसार महाविकास आघाडीचे हे दोन्ही उमेदवार आघाडीवर आहेत.
Arun Lad and Jayant Asgaonkar from Pune are in the lead
Arun Lad and Jayant Asgaonkar from Pune are in the lead

पुणे : पुणे मतदारसंघातील पदवीधर आणि शिक्षक उमेदवारांच्या मतमोजणीस सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या कलानुसार पदवीधरमधून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार अरुण लाड आघाडीवर असून भाजपचे संग्रामसिंह देशमुख पिछाडीवर पडले आहेत. शिक्षक मतदारसंघातूनही कॉंग्रेसचे जयंत आसगावकर यांनी पहिल्या फेरीतच आघाडी घेतली आहे. आसगावकर यांची भाजपचे जितेंद्र पवार आणि अपक्ष दत्तात्रेय सावंत यांच्याशी लढत होत आहे. 

पुणे मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. दोन्ही पक्षाकडून सांगली जिल्ह्यातील उमेदवार देण्यात आले आहेत. असे असली तरी पुणे जिल्ह्यात सर्वाधिक मतदारांची नोंदणी झाली होती. त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते व नेत्यांना या या मतदारसंघात विजय मिळण्याचा दावा करत आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा मतदारसंघ पुणे जिल्ह्यात येत असल्याने त्यांनी ही निवडणूक एकहाती संभाळत झंझावती प्रचार केला होता. 

भाजप्रमाणेच राष्ट्रवादीनेही पुणे जिल्ह्यावर लक्ष केंद्रीत केले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह जलसंपदा मंत्री जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार यांनी प्रचाराची धुरा संभाळली होती. दोन्ही बाजूंकडून अत्यंत चुरशीने ही निवडणूक लढवली होती. तसेच, पक्षीय पातळीवर प्रथमच यावेळी राजकीय पक्षांनी निवडणुकीत लक्ष घातले होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com