शैलेश मोहितेंविरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेस आक्रमक : अटक करा; नाहीतर साताऱ्यात आंदोलन करू

असे गुन्हे करणारी व्यक्ती पक्षात नको.
Arrest Shailesh Mohite; Otherwise, we will agitate in Satara: Demand of NCP Women's Congress
Arrest Shailesh Mohite; Otherwise, we will agitate in Satara: Demand of NCP Women's Congress

चाकण (जि. पुणे) : खेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते यांची बदनामी करण्यासाठी हनीट्रॅप रचलेल्या प्रकरणी संशयित आरोपी संशयित आरोपी डॉ. शैलेश शिवाजीराव मोहिते, माजी नगरसेवक राहुल कांडगे यांच्याविरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेस आक्रमक झाल्या आहेत.

डॉ. शैलेश मोहिते, माजी नगरसेवक राहुल कांडगे या दोघांना पोलिसांनी तत्काळ अटक करावी, नाहीतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी साताऱ्यात जाऊन पोलिस ठाण्यासमोर तीव्र आंदोलन करतील, असा इशारा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या मंगल चांभारे, खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा संध्या जाधव व इतरांनी पत्रकार परिषदेत दिला.

खेडचे आमदार दिलीप मोहिते यांची जाणून बुजून बदनामी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी असलेले डॉ. शैलेश मोहिते व राहुल कांडगे यांनी षडयंत्र रचले आहे. त्यांचा या प्रकरणी भांडाफोड झाला आहे. डॉ. शैलेश मोहिते हे काय करतात, ते सर्वाना माहीत आहे. त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून हकालपट्टी झाली पाहिजे, अशी आमची मागणी आहे. याबाबत वरिष्ठांना निवेदन पाठवले आहे, असे या महिला पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

याशिवाय राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनाही तशा मागणीचे निवेदन देण्यात आलेले आहे. असे गुन्हे करणारी व्यक्ती पक्षात नको, अशा व्यक्तींचा निषेध आहे. कोणीही अशा व्यक्तीला पाठीशी घालू नये, अशी मागणी या पदाधिकाऱ्यांनी केली.

खेड तालुक्यातील महिला पदाधिकारी शैलेश मोहिते यांना पुढील काळात बांगड्या भरणार आहेत, असे या वेळी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या चांभारे यांनी सांगितले. या वेळी संध्या जाधव, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या चाकण शहर अध्यक्षा स्मिता शहा, पुणे जिल्हा उपाध्यक्षा शोभा शेवकरी, कांचन ढमाले, संगीता नायकवाडी, मनीषा टाकळकर, सीमा साळसकर यांनीही आक्रमपणे मागणी करून डॉ. शैलेश मोहिते, राहुल कांडगे यांचा निषेध केला. 

या वेळी खेड कृषी उत्पन बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल नायकवाडी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com