सुप्रिया सुळेंनी राऊतांना करुन दिली पूर्वीच्या प्रस्तावाची आठवण

सुप्रिया सुळे यांनी नितीन राऊत यांची भेट घेऊन वीज पुरवठ्याशी संबंधित अन्य विषयांवर चर्चा केली.
Sarkarnama (84).jpg
Sarkarnama (84).jpg

पुणे :  बारामती लोकसभा मतदार संघातील बारामती, दौंड आणि पुरंदर तालुक्यातील काही गावांमध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्प  solar agriculture सुरू करण्यास लवकरात लवकर मंजुरी मिळावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे Supriya Sule यांनी उर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे केली. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची भेट घेऊन सुळे यांनी या मुख्य विषयासह बारामती लोकसभा मतदार संघातील वीज पुरवठ्याशी संबंधित अन्य विषयांवर चर्चा केली. 

पुणे जिल्हा विद्युत सनियंत्रण समितीचे सदस्य प्रवीण शिंदे यावेळी उपस्थित होते. राऊत यांना लेखी निवेदनही देण्यात आले असून त्यांनी याबाबत सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. बारामती लोकसभा मतदार संघात पुरंदर तालुक्यातील कोळविहीरे, दिवे, कोथळे, पिंपरे आणि माहूर, दौंड तालुक्यातील हिंगणी बेर्डी, राहू तसेच बारामती तालुक्यातील मुरूम, देऊळगाव रसाळ, वाकी, गदरवाडी, वाढाणे, पणदरे, जळगाव सुपे, मोढवे, वडगाव निंबाळकर, खालकर वाडी, या गावांत मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्प सुरू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. 

गणराय माझ्यावर आलेले संकट नक्कीच दूर करेल,  मी वाईट काम केलेलं नाही
याबाबत महावितरणच्या बारामती मंडळाने ऊर्जा मंत्रालयालाकडे यापूर्वीच प्रस्ताव पाठवला आहे. त्याची आठवण करून देत त्या प्रस्तावांना मंजुरी मिळावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी राऊत यांच्याकडे यावेळी केली. याबरोबरच वेल्हे तालुका ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट साठी ६३ के.व्ही.च्या ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून द्यावा, भाटघर येथील सबस्टेशन तीन वर्षांपूर्वी पाण्यात बुडाले होते. त्याची दुरुस्ती आणि नूतनीकरण करण्यात यावे, मुळशी तालुक्यातील भूगाव येथे १३२ के.व्ही. सबस्टेशन मंजूर झाले आहे, त्याचे काम तातडीने सुरु करण्यात यावे आदी मागण्याही सुप्रिया सुळे यांनी राऊत यांच्याकडे केल्या आहेत. 

वीज वितरणसंदर्भात भोर तालुक्याचा काही भाग पुणे ग्रामीण मंडळ,  तर काही भाग बारामती ग्रामीण मंडळाला जोडला आहे. परिणामी वीज ग्राहकांना दोन वेगवेगळ्या ठिकाणी जावे लागते. ग्राहकांचा हा त्रास कमी करण्यासाठी संपूर्ण भोर तालुक्याचा समावेश पुणे ग्रामीण मंडळाला जोडावा, अशी मागणी त्यांनी केली. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com