मेधा कुलकर्णींचे अखेर राजकीय पुनर्वसन

मेधा कुलकर्णी या २०१४ मध्ये पहिल्यादा कोथरुड मतदार संघातून आमदार झाल्या होत्या.
  Medha Kulkarni .jpg
Medha Kulkarni .jpg

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यपदी कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकणी (Medha Kulkarni) यांची आज नियुक्ती करण्यात आली. कोथरुड विधानसभेचे तिकिट नाकारल्यानंतर मेधा कुलकर्णी कोणत्याही पदावर नव्हत्या. त्यामुळे त्या पक्षात नाराज असल्याचे बोलले जात होते. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी त्यांना राजकीय पुनर्वसन करण्याचे आश्वासन दिले होते. (Appointment of Medha Kulkarni as National Vice President of BJP Mahila Morcha)

मेधा कुलकर्णी यांच्या नियुक्तीने ते आज प्रत्यक्षात उतरले. कुलकर्णी यांच्यासह आणखी सहा जणींचीही या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये मालती रॅाय (पश्चिम बंगाल), दर्शना सिंह (उत्तर प्रदेश), रेखा गुप्ता (दिल्ली), विरेंदर थांडी (पंजाब), ज्योतीबेन पांड्या (गुजरात), पूजा मिक्षा (राजस्थान) यांचा समावेश आहे. मेधा कुलकर्णी या २०१४ मध्ये पहिल्यादा कोथरुड मतदार संघातून आमदार झाल्या होत्या. या आधी त्या पुणे महानगरपालिकेत नगरसेवक होत्या.   

हे ही वाचा

गिरीष बापटांनाही हवी शिवसेनेशी युती; उद्धव ठाकरेंच्या निर्णयाकडं लक्ष
 
पुणे : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रावरून राज्यातील राजकारण तापलं आहे. या पत्रामुळं पुन्हा एकदा भाजप व शिवसेनेच्या युतीची चर्चा सुरू झाली आहे. भाजपच्या काही नेत्यांनाही ही युती व्हावी, असे वाटत आहे. पुण्यातील भाजपचे खासदार गिरीष बापट (Girish Bapat) यांनीही युती झाल्यास आनंदच होईल, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

सरनाईक यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, भाजपशी युती केल्यावर शिवसेनेला फायदा होईलच. शिवाय आमच्या सारख्यांना होणारा त्रासही वाचेल, सरनाईक यांनी ठाकरे यांना दोन पानी पत्र लिहून महाविकास आघाडीतील मित्र पक्षांवरच तोफ डागली आहे. राष्ट्रवादी-काँग्रेस आपलेच कार्यकर्ते फोडत आहेत. आपला पक्ष कमकुवत होत असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जुळवून घेतलेले बरे. त्यामुळे सरनाईक, परब, वायकर या सहकाऱ्यांना होत असेलला नाहक त्रास थांबेल, असे त्यांनी म्हटले आहे.

यावर बोलताना बापट म्हणाले, भाजप कोणतीही कारवाई करत नाही. भाजप गरीब पक्ष असून लोकांना मदत करणारा पक्ष आहे. सरनाईक यांनी भीतीच्या पलीकडे आणि सुरक्षेच्या दृष्टीने बोलकी प्रतिक्रिया दिली आहे. भविष्यात अशा गोष्टी होऊ शकतात. आमची युती अनैसर्गिक आघाडीमुळं तुटली होती. भविष्यात युती होऊ शकते. आम्हाला त्याचा आनंद होईल, असे बापट यांनी सांगितले. 

सरनाईक आता जे बोलत आहेत, ते भाजपचे नेते महाविकास आघाडी सरकार होण्याआधीपासूनच बोलत होते. सरनाईक यांच्या पत्राचा त्यांचे नेते सकारात्मक विचार करतील. यावर त्यांच्या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना निर्णय घ्यायचा आहे, असेही बापट म्हणाले. 

पालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला प्राधान्य

पुढील वर्षी राज्यात मुंबईसह पुणे, पिंपरी चिंचवड व अन्य काही महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे. तर शिवसेना व राष्ट्रवादीच्या आघाडीची चर्चा आहे. त्यातच सरनाईक यांच्या पत्रामुळं भाजप व शिवसेनेच्या युतीची चर्चा सुरू झाली आहे. यावर बोलताना बापट यांनी पालिका निवडणुकीत शिवसेनेशी युतीलाच प्राधान्य असेल, असे सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस हा पश्चिम महाराष्ट्रातील छोटा पक्ष आहे. तो अखिल भारतीय पक्ष नाही. या पक्षापेक्षा शिवसेनेला प्राधान्य राहील, असा टोलाही बापट यांनी लगावला.   

Edited By - Amol Jaybhaye   

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com