मंगलदास बांदलांवर आणखी एक गुन्हा दाखल 

ताज्या गुन्ह्यात त्यांच्या पत्नी व जिल्हा परिषद सदस्या रेखा बांदल यांचे भाऊ दिनेश कामठे यांचा समावेश आहे.
Another case was registered against Mangaldas Bandal
Another case was registered against Mangaldas Bandal

शिक्रापूर  (जि. पुणे) : पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम समितीचे माजी सभापती मंगलदास बांदल यांचा २६ मे पासून पोलिस कोठडीत राहण्याचा सिलसिला आजही कायम होता. कारण, बुधवारी (ता. २ जून) शिरुर न्यायालयाने एका प्रकरणात न्यायालयीन कोठडी सुनावताच त्यांच्यावर दोन कोटींच्या फसवणूकीचा आणखी एक गुन्हा दाखल झाला आणि आज पुन्हा त्यांना न्यायालयाने आणखी एक दिवसांची पोलिस कोठडी वाढविली. दरम्यान ताज्या गुन्ह्यात त्यांच्या पत्नी व जिल्हा परिषद सदस्या रेखा बांदल यांचे भाऊ दिनेश कामठे यांचा समावेश आहे, अशी माहिती शिरूरचे पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिली. (Another case was registered against Mangaldas Bandal)

दत्तात्रेय मांढरे यांच्या फिर्यादीवरुन २६ मे रोजी बांदलांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल होऊन त्यांना १ जूनपर्यंत पोलिस कोठडी मिळाली. त्यांना एक जूनला जामीन मिळेल, असे वाटत असतानाच ३१ मे रोजी दुसरा फसवणुकीचा गुन्हा मंदार पवार (तळेगावढमढेरे, ता. शिरूर) यांच्या तक्रारीवरुन दाखल झाला. त्यांना अटक होऊन एक दिवसाची म्हणजेच गुरुवारपर्यंत (ता. ३ जून) पोलिस कोठडी सुनावली. कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना आज शिरुर न्यायालयात हजर केले असता त्यांच्यावर रवींद्र सातपुते (जातेगाव बुद्रुक, ता.शिरूर) यांनी फसवणुकीचा तक्रार दाखल केल्यावरून बुधवारी (ता.२ जून) आणखी एक गुन्हा दाखल झाला. 

या प्रकरणात सातपुते यांनी बांदल यांचे मेहुणे दिनेश कामठे तसेच गुलाब पवार यांच्याविरोधात तक्रार दाखल केल्याने बांदलांसह कामठे व पवार यांच्यावरही सुमारे दोन कोटी रुपयांच्या फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिली.

या प्रकरणातही वरील तिघांनी संगनमताने शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेत रवींद्र सातपुते यांची खोटी सही, त्यांचे आधारकार्ड, पॅनकार्ड आदींचा वापर करुन दोन कोटींच्या कर्जप्रकरणात जामीनदार दाखविले आहे. या प्रकरणात बॅंकेनेही आपल्या सही, आधारकार्ड व पॅनकार्डची कुठलीच खात्री न करता हा प्रकार केल्याची फिर्यादी दिली आहे. 

दरम्यान, बांदलांची सर्व प्रकरणे ही शिक्रापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीच्या बाहेर असलेल्या शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेशी संबंधित असल्याचा युक्तीवाद त्यांच्या वकीलांनी केला होता. मात्र, भोसले बॅंकेत तारण जमिनी या सर्व शिक्रापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील असल्याचा युक्तीवाद सरकारी वकील अ‍ॅड. महाले व तपास अधिकारी पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी केल्याने बांदलांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली गेल्याचे पोलिसांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com