कोल्हे म्हणतात, 'तुम्हीच सांगा माझे मतदारसंघाकडे लक्ष आहे की दुर्लक्ष?' 

केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री गिरीराज सिंह यांची भेट घेऊन संरक्षित प्राण्यांमधून बैलाला वगळण्याची मागणी केली आहे.
Amol Kolhe says, 'You tell me, is my constituency focused or ignored?'
Amol Kolhe says, 'You tell me, is my constituency focused or ignored?'

टाकळी हाजी (जि. पुणे) : महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना या प्रमुख पक्षाच्या शिरूर लोकसभा मतदारसंघातील नेतेमंडळींमध्ये महिनाभरापूर्वी चांगलाच कलगीतुरा रंगला होता. खासदार डॉ. अमोल कोल्हे हे मतदारसंघातून गायब झाले आहेत, कोरोना महामारीच्या काळात त्यांचे मतदारसंघाकडे लक्ष नाही, अशी टीका शिवसेनेकडून करण्यात येत होती. 

शिरूर तालुक्‍याच्या दौऱ्यात, कोल्हे यांना तुमचे मतदारसंघाकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका होत आहे, असे विचारले असता ते म्हणाले की, "शिरूर लोकसभा मतदार संघातील सर्व समस्या माझ्या तोंडपाठ आहेत. तसेच, कोरोनाशी संबंधित, विकास कामे याबाबतची माहिती आकडेवारीसह दिली आहे, त्यामुळे तुम्हीच सांगा माझे मतदारसंघाकडे लक्ष आहे की दुर्लक्ष? असा प्रश्‍न त्यांनी पत्रकारांना केला. 

कोरोनाच्या काळात खासदार कोल्हे मतदारसंघातून गायब झाले असून ते चित्रीकरणात व्यस्त आहेत, अशी टीका व्यंग्यचित्राच्या माध्यमातून शिवसेनेकडून करण्यात आली होती. त्याला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे भाजपत जाणार असून त्यासाठी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांची भेट घेतली आहे, असा पलटवार केला होता. दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या होत्या. 

या पार्श्‍वभूमीवर खासदार कोल्हे यांचा शिरूरचा दौरा केला. त्यांनी मलठण येथील कोव्हिड सेंटरला भेट दिली. या वेळी त्यांनी कोव्हिड सेंटरमधील समस्या जाणून घेतल्या. त्यांच्या सोबत प्रांतधिकारी संतोष देशमुख होते. येथील कर्मचारी चांगले काम करत असल्याचे नेते व कार्यकर्त्यांनी सांगितले. मात्र, त्यांचे वेतन दोन महिन्यांपासून मिळाले नाही. मग यांनी काम कसे करायचे, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. 

कोरोना रुग्णांची विचारपूस करताना डॉ. कोल्हे म्हणाले की, "कसे आहात?' "येथे उपचार व्यवस्थित होतो ना? त्यावर येथील रुग्णांनी उपचार, जेवण व राहण्याची सोय चांगली असल्याचे सांगितले. त्यावेळी एक कार्यकर्ता म्हणाला, साहेब या ठिकाणी सगळं काही चांगलं आहे. पण, जेवणवाल्याचं बिल मिळालं नाही. बिलाची रक्कम थकल्याने दुकानदार रेशन द्यायला तयार नाही. त्यामुळे या रुग्णांना जेवण कसे पुरवायचे, ही समस्या सोडवावी. याप्रश्‍नी कोल्हे यांनी प्रांताधिकारी देशमुख यांना लक्ष घालण्यास सांगितले. 

त्यानंतर माध्यमाशी बोलताना कोल्हे यांनी कोरोनावरील उपाय योजना, कांदा, वाहतूक कोंडी, पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्ग, मेट्रो याबाबतची सद्यस्थिती आणि आकडेवारी सांगितली. तसेच, बैलगाडा शर्यती उठविण्यासाठी संसदेत लक्षवेधी मांडल्याचे सांगून केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री गिरीराज सिंह यांची भेट घेऊन संरक्षित प्राण्यांमधून बैलाला वगळण्याची मागणी केली आहे. त्याला मंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याची माहिती दिली. तसेच, या मतदारसंघातील पर्यटनाला चालना मिळावी, यासाठी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट ठरल्याचे नमूद केले. 

शिरूर लोकसभा मतदार संघाकडे तुमचे दुर्लक्ष होत असल्याची टीका विरोधक करत आहेत, असे विचारले असता डॉ. कोल्हे म्हणाले की, शिरूर लोकसभा मतदार संघातील समस्या माझ्या तोंडपाठ आहेत. त्यावर सुरू असलेल्या कामाची आकडेवारी मी दिली आहे. मग तुम्हीच सांगा माझे मतदारसंघाकडे लक्ष आहे की दुर्लक्ष? असा प्रश्‍न त्यांनी केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com