पुणे : टीक टाॅक स्टार पूजा चव्हाणच्या मृत्यूनंतर राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्यावर विरोधी पक्षाकडून सातत्याने विविध आरोप करण्यात येत आहेत. तेव्हापासून ते नॉट रिचेबल आहेत. ते पोहरादेवी येथे येणार, अशी माहिती महंत सुनील महाराज यांनी दोन दिवसांपूर्वी माध्यमांना दिली होती. पण मंत्री राठोड आलेच नाहीत. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात अद्याप कोणताच खुलासा पोलिस प्रशासनाने केला नाही. यामुळे पूजा चव्हानच्या नातेवाईक शांताताई राठोड यांनी पोलीस तपासावर संशय व्यक्त केलाय.
पूचा चव्हाणच्या नातेवाईक शांताबाई राठोड म्हणाल्या की, पूजानी आत्महत्या केली नाही. पूजाला ज्या यवतमाळच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. तिथेच तिला मारले असावे आणि पुण्यातील बिल्डींगवरून फेकले असावे. असा संशय राठोड यांनी व्यक्त केलाय. पूजा ही आत्महत्या करणारी मुलगी नव्हती. तिने आत्महत्या केली नाही तर तिचा घातच झालाय. असे देखील शांताताई राठोड म्हणाल्या आहेत.
दरम्याण, हिंगोली जिल्हा परिषदेच्या मैदानावर संजय राठोड यांच्या समर्थनार्थ बंजारा समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे, या मोर्चात सहभागी होण्यासाठी शिवसेना नेते, आमदार संतोष बांगर हे देखील पुढे आले आहेत, मंत्री राठोड यांच्यावर आरोप झाल्यानंतर शिवसेना पहिल्यांदाच या मोर्चाच्या निमित्ताने रस्त्यावर उतरताना पाहायला मिळत आहे.
"पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी कुणालाही पाठिशी घालणार नाही. या प्रकरणाची चैाकशी पोलिस करीत आहेत. त्यांना चैाकशी वेळ दिला पाहिजे. या तपासात राजकीय हस्तक्षेप नाही, " असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल सांगितले होते.
दरम्याण, पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात पुणे पोलिसांच्या पथकाने दोन जणांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी यवतमाळ आणि परळीत गेलेल्या पोलिसांच्या पथकाने या दोन जणांना ताब्यात घेतले आहे. संजय राठोड यांना वाचविण्यासाठी पोलिसांकडून गुन्हा दाखल केला जात नसल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.
संजय राठोड यांच्या समर्थनार्थ शिवसेना रस्त्यावर... https://t.co/V6edQ4TqQU
— Sarkarnama (@SarkarnamaNews) February 20, 2021
पोलिस योग्यप्रकारे तपास करत नसल्याचे आरोपही विरोधकांनी केले आहेत. या प्रकरणावरून विरोधकांकडून पुणे पोलिसांना लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे राज्याच्या पोलिस महासंचालकांचेही या प्रकरणाकडे बारकाईने लक्ष आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनीही या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पुणे पोलिसांकडून यवतमाळमध्येही याप्रकरणाचे धागेदोरे शोधले जात आहेत. या प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

