अजित पवारांनी अधिकाऱ्यांना दिल्या सूचना...

अजित पवार यांनी आज 'निसर्ग' चक्रीवादळामुळे पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील भोयरे व पवळेवाडी येथील झालेल्या नुकसानीची पाहणी केली.
pawarf.
pawarf.

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज  'निसर्ग' चक्रीवादळामुळे पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील भोयरे व पवळेवाडी येथील झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी
आमदार सुनील शेळके, जिल्हाधिकारी नवल किशोर राम उपस्थित होते. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त झालेल्या पॉलीहाऊसचीही पाहणी केली. चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले. 

मावळ तालुक्यात फुल उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. कोरोना सुरू झाल्यापासून फुल उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. बाजार बंद असल्याने
दररोज कोट्यवधीचे नुकसान होत होते. कोरोनाचा फटका मोठ्या प्रमाणात फुल उद्योगास बसला आहे. कोरोनाच्या महामारीचा झटका बसल्यावर गेल्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या
चक्रीवादळाचा जोरदार तडाखा मावळ तालुक्यातील फुल उद्योगास बसला आहे. 

आज उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी चक्रीवादळामुळे व पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मावळ तालुक्यात पाहणी दौरा केला. यावेळी चक्रीवादळाचा फटका
बसलेल्या कल्हाट, पवळेवाडी येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेत विचारपूस केली. यावेळी मावळ तालुक्यातील सर्व पॉलीहाऊस शेतकऱ्यांनी नुकसान झालेल्या पॉलीहाऊसचे
पंचनामे करुन नुकसान भरपाई मिळावी असे निवेदन दिले. या गावातील नुकसानीची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहणी केल्यावर त्यांनी अधिकाऱ्यांना नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले. कोणताही बधितांचे नुकसानीचे पंचनामे राहता कामा नयेत, अशा सूचना दिल्या. 

नुकसान भरपाई मिळावी 

मावळ, आंबेगाव, जुन्नर, खेड, वेल्हे, मुळशीसह इतर तालुक्यातही वादळानं मोठे नुकसान केले आहे. घरं, शाळा, अंगणवाड्या, गुरांचे गोठे, भाजीपाल्याची पिके, फळबागांचं झालेलं नुकसान प्रचंड आहे. मावळ मधी पॉली हाऊस चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पुणे जिल्हा फुल उत्पादक संघाचे अध्यक्ष शिवाजी भेगडे 'सरकारनामा'शी बोलताना म्हणाले, "कोरोनाच्या काळात दररोज किमान दीड कोटी रुपयांचे नुकसान झाले. आता या पावसाने आणि वादळाने 700 एकर क्षेत्रातील पॉलीहाऊसचे नुकसान झाले आहे. 14 मार्चपासून आमच्यावर संकट आले आहे. ते अजून दूर झालेले नाही. नुकसान झालेल्या हाऊसचे पंचनामे करून आम्हाला नुकसान भरपाई मिळावी."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com