कोरोनाग्रस्तांकडून जादा बिल घेणाऱ्या हॉस्पिटलला अजितदादांचा दणका; अडीच लाख केले परत 

राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षा वैशाली नागवडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे या बाबत तक्रार केली होती.
Ajit pawar's hit the hospital for taking extra bills from Corona patients; Two and a half lakh returned
Ajit pawar's hit the hospital for taking extra bills from Corona patients; Two and a half lakh returned

दौंड (जि. पुणे) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आदेश देताच महसूल प्रशासनाने कोरोनाग्रस्त रुग्णांकडून अवास्तव बिले आकारणाऱ्या दौंड तालुक्‍यातील मयूरेश्वर हॉस्पिटलवर कारवाई केली. या हॉस्पिटलने जादा आकारलेले बिल वसूल करीत 14 रुग्णांना 2 लाख 48 हजार 914 रुपये परत करण्यात आले. 

दौंड तालुक्‍यातील बोरीपार्धी येथील मयूरेश्वर हॉस्पिटल या अधिग्रहित रुग्णालयाच्या वतीने देऊळगाव गाडा येथील डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल केअर सेंटरमध्ये वाढीव बिलांची वसुली आणि महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ दिला जात नव्हता.

या प्रकरणी राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या पुणे जिल्हाध्यक्षा वैशाली नागवडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे या बाबत तक्रार केली होती. अजित पवार यांनी अडवणूक करणाऱ्या हॉस्पिटलच्या विरोधात कारवाई करण्यासंबंधी आदेश दिला. त्यानंतर तक्रारीनुसार बिलांची तपासणी करण्यासाठी सात अधिकारी यांचा समावेश असलेली चौकशी समिती नियुक्त करण्यात आली होती. 

समितीच्या अहवालात रुग्णांना 4 लाख 98 हजार रूपये जास्त आकारल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते. त्याचबरोबर चौकशी दरम्यान 104 रुग्णांवर उपचार झालेले असताना फक्त 77 जणांच्या फाईल्स तपासणीसाठी देणे, आवश्‍यक नोंदी न ठेवणे आदी एकूण 17 गंभीर त्रुटी समोर आल्या आहेत. 

अहवाल प्राप्त झाल्यानंतर प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड यांनी ही रक्कम वसूल करण्याचे आदेश दिल्यानंतर मयूरेश्वर हॉस्पिटलने बोरीपार्धीचे तलाठी व्ही. एम. भांगे यांच्याकडे 14 धनादेश जमा केले. सुमारे 14 बाधितांना एकूण 2 लाख 48 हजार 914 रूपये धनादेशाद्वारे परत देण्यात आले आहेत. हॉस्पिटलकडून आणखी दोन लाख रुपये बाधित रूग्णांना देणे बाकी असून त्याची प्रक्रिया सुरू आहे. 

कोरोनाग्रस्तांना लुटणाऱ्यांना आणि चुकीचे वागणाऱ्या हॉस्पिटल चालकांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांनादेखील या कारवाईमुळे नक्की धडा मिळेल, अशी अपेक्षा वैशाली नागवडे यांनी या कारवाईनंतर व्यक्त केली. 

Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com