अजित पवार म्हणतात यामुळेच याचा मला राग येतो....

हेच मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकले असते, तर काय म्हटले असते. आम्हीच कायदा केला होता,
Ajit Pawar.jpg
Ajit Pawar.jpg

पुणे : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायदा रद्द केल्यापासून राज्य सरकारवर टीका होत आहे. छत्रपती खासदार संभाजीराजे यांनीही सरकारला इशारा दिला आहे. त्यातच भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पहाटेच्या शपथविधीवरून उपमुख्यमंत्री अजित पवारांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. या सर्वच मुद्द्यांवरून अजित पवार (Ajit Pawar) भाजपवर भडकले. (Ajit Pawar's criticism of Chandrakant Patil)

पवार पुण्यामध्ये बोलत होते. यावेळी ते म्हणाले की ''हेच मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकले असते, तर काय म्हटले असते. आम्हीच कायदा केला होता,'' अशा शब्दात पवारांनी भाजपवर निशाणा साधला आहे. ५४ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र बाहेर कसे आले, असे पाटील म्हणाले होते. यावर बोलताना अजित पवार म्हणाले, ''जी गोष्ट झाली आहे, तिला चौदा महिने झाले. मागच्या गोष्टी उकरून काढत आहेत. ज्यांना काम नाही ते नको त्या गोष्टी बोलतात. आता कोरोनाकडे लक्ष देणे महत्वाचे आहे. कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचेही पवार म्हणाले.  

राज्यपाल यांना भेटलो, वरिष्ठांना देखील भेटणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने जे ग्राह्य धरले, त्यानुसार विचार करू. सेवानिवृत्त मुख्य न्यायाधीश दिलीप भोसले आणि सदस्यांची मते जाणून घेत असून आम्ही मार्ग काढत आहोत. मात्र, काही जण काहीही बोलत आहेत. आरक्षण टिकवता आले नाही असे म्हणत आहेत. हेच मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकले असते, तर काय म्हटले असते. आम्हीच कायदा केला होता. आम्हीच असे केले होते, तसे केले होते. असले धंदे आहेत, त्यामुळे याचा मला राग येतो, अशी संतप्त प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.

नरेंद्र पाटील यांनी मराठा आरक्षणावरून राज्य सरकारवर टीका केली होती. त्यालाही पवार यांनी उत्तर दिले. ''काहीजण भावनेच्या आहारी जाऊन काहीही बोलतात. कायदा, संविधान काही बघत नाही. ही लोक काही काळ आमच्या बरोबर होती. त्यांचा आवाका किती आहे. हे आम्हाला माहिती आहे. त्यामुळे फार महत्त्व देत नाही, ''असे पवार म्हणाले. संभाजीराजे यांनी दिलेल्या इशाऱ्यावर अजित पवार म्हणाले की ''मी त्यांच्याशी बोललो होतो. पण त्यांनी सांगितले की, ६ तारखेचा कार्यक्रम होऊ द्या. तसेच त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे त्यांच्या मागण्या मांडल्या आहेत. आता महाविकास आघाडी सरकार त्यावर लवकरच निर्णय घेईल, असे त्यांनी सांगितले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com