जरंडेश्वर कारखान्यावर ईडीची कारवाई झाली अन् अजित पवार म्हणाले...

जरंडेश्वर कारखाना विकत घेण्यासाठी १२ ते १५ कंपन्यांनी टेंडर भरले होते.
Ajit Pawar.jpg
Ajit Pawar.jpg

पुणे : साताऱ्यातील जरंडेश्वर कारखान्यावर (Sugar Factory) सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) कारवाई केली. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याच्या अनुषंगाने ईडीने उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात असलेल्या 'जरंडेश्वर शुगर्स' कारखान्यावर जप्तीची कारवाई केली. ईडीच्या या कारवाईवर बोलताना पवार म्हणाले, जरंडेश्वर कारखाना संचालक मंडळाने विकलेला नसून उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार विक्री करण्यात आला आहे. (Ajit Pawar said on the action of ED on Jarandeshwar factory) 

अजित पवार पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी पवार म्हणले, साखर कारखान्यांना एक वर्षाची मुदत द्या अशी सूचना करण्यात आली होती. एका वर्षात जर त्यांनी रक्कम न भरता पैसे थकवले तर ते विक्रीला काढा असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटेल होते. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, कायदेशीर प्रक्रिया राबवून टेंडर काढून साखर कारखाना विक्री करण्यात आला आहे. त्या १४ साखर कारखान्यांमध्ये जरंडेश्वर साखर कारखानादेखील होता. 

जरंडेश्वर कारखाना विकत घेण्यासाठी १२ ते १५ कंपन्यांनी टेंडर भरले होते. पण यामधील सर्वात जास्त टेंडर 'गुरू कमोडिटी' या कंपनीने भरले होते. त्यांनी ६५ कोटी ७५ लाखांची बोली लावली होती. अशाच प्रकारे वेगवेगळ्या कंपन्यांनी इतर साखर कारखाने विकत घेतले, असे पवारांनी सांगितले.

गुरु कमोडिटीने विकत घेतलेला कारखाना बीव्हीजी ग्रुपचे हनुमंत गायकवाड आणि माने यांनी चालवण्यासाठी मागितला होता. अनेक कारखाने चालवायला दिले जातात. मात्र, दुर्दैवाने त्यांना पहिल्याच वर्षी पाच कोटींचा तोटा झाला. ३० ते ३५ वर्षांसाठी त्यांनी कारखाना चालवायला घेतला होता. जरंडेश्वर शुगर मिल नावाने त्यांनी जी कंपनी सुरु केली. ती नंतर माझे नातेवाईक राजेंद्र घाडगे यांनी चालवायला घेतली. पण नंतरच्या काळातही तोटा झाला. त्यानंतर रितसर परवानगी घेत त्याचा विस्तार करण्यात आला. यासाठी रितसर कर्ज घेण्यात आले असून ते फेडलेही जात आहे,'' असे पवार यांनी सांगितले.  

Edited By - Amol Jaybhaye 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com