संकटात सापडला आहात...पुणे पोलिसांचे 'माय पुणे सेफ' अॅप करेल तुम्हाला मदत - Ajit Pawar inaugurates Pune Police's My Pune Safe app | Politics Marathi News - Sarkarnama

संकटात सापडला आहात...पुणे पोलिसांचे 'माय पुणे सेफ' अॅप करेल तुम्हाला मदत

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 11 जून 2021

नागरिकांनाही आपल्या आजूबाजूच्या घटनांबद्दल या अॅपच्या माध्यमातून माहिती देता येणार आहे.

पुणे : शहरातील नागरिकांसाठी आणि कोणत्याही घडलेल्या घटनेच्या ठिकाणी पोलिसांची तात्काळ सेवा उपलब्ध होण्यासाठी पुणे पोलिसांनी My Pune Safe हे अॅप तयार केले आहे. या अॅपचे शुक्रवारी (ता. ११ जून) उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्याचबरोबर पोलिसांसाठीच्या बदली अॅपचेही उद्धाटन यावेळी करण्यात आले. (Ajit Pawar inaugurates Pune Police's My Pune Safe app) 

My Pune Safe अॅपची कार्यपद्धतीः

या अॅपची निर्मिती पुणे शहरातल्या नागरिकांसाठी तसंच घटनास्थळी पोलिसांची तात्काळ सेवा मिळावी यासाठी करण्यात आली आहे.  अॅपची संकल्पना पुणे शहराच्या पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आहे. या अॅपच्या माध्यमातून पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडणाऱ्या गुन्ह्याला प्रतिबंध करण्यासाठी मदत मिळणार आहे. 

हे ही वाचा : आमची दोस्ती जंगलातील वाघाशी होती; पिंजऱ्यातील नव्हे: चंद्रकांतदादांचा शिवसेनेला चिमटा 

घटनास्थळाची माहिती आणि महत्त्वाच्या ठिकाणचे फोटो या अॅपवर अपलोड करता येणार आहेत. नागरिकांनाही आपल्या आजूबाजूच्या घटनांबद्दल या अॅपच्या माध्यमातून माहिती देता येणार आहे. अशा प्रकारे फोटो अपलोड केल्याने घटनेच्या ठिकाणाचे अक्षांश, रेखांश आणि वेळ नोंद केली जाणार आहे. या अॅपवरुन पोलीस नियंत्रण कक्ष माहिती मिळवेल आणि आजूबाजूच्या परिसरातल्या गस्तीवर असणाऱ्या बीट मार्शलला त्याची तात्काळ माहिती दिली जाणार आहे. त्याचबरोबर बीट मार्शलने कोणत्या वेळी कोणत्या ठिकाणी भेट दिली याची माहितीही या अॅपच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. 

हे ही वाचा : राष्ट्रवादीच्या घड्याळातील काटा हा दहा वाजून दहा मिनिटांवरच का?

दरम्यान, पुणे पोलीस मुख्यालयातील (Pune Police Headquarters) ब्रिटिशकालीन इमारतीचे नुतनीकरण करण्यात आले असून, या इमारतीमध्ये आता विविध विभागाची कार्यालये सुरू केली जाणार आहे. या इमारतीच्या नुतनीकरणाची पाहणी उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शुक्रवार (ता ११ जून) सकाळी केली. यावेळी सदोष काम करण्यात आले असल्याचे पवारांच्या निदर्शनास आले. त्यांनी लागलीच संबंधित ठेकेदाराला बोलवण्यास सांगितले आणि केलेल्या कामावरून त्यांची कानउघाडणी केली. 

Edited By - Amol Jaybhaye  

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख