गर्दी पाहून वाटलं की कार्यक्रम न करताच परत जावं  : अजित पवार - Ajit Pawar apologized for the crowd at the NCP's program | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

गर्दी पाहून वाटलं की कार्यक्रम न करताच परत जावं  : अजित पवार

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 19 जून 2021

सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता.

पुणे  ः  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुण्यातील कार्यालयाच्या उद्‌घाटन कार्यक्रमास उसळलेली गर्दी पाहून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलगिरी व्यक्त केली. गाडीतून उतरत असताना गर्दी पाहून माझ्या मनात विचार आला की उद्‌घाटन न करताच परत जावं. पण, मी तसं वागलो असतो तर कार्यकर्ते नाराज झाले असते. त्यामुळे मी पुणेकरांची दिलगिरी व्यक्त करतो, अशा शब्दांत पवार यांनी कोरोना नियमांचं उल्लंघन झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. (Ajit Pawar apologized for the crowd at the NCP's program)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुण्यातील कार्यालयाचे उद्‌घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. तत्पूर्वी सकाळी पुण्यात बोलताना अजित पवार यांनी गर्दी करणाऱ्या नागरिकांबाबत नाराजी व्यक्त केली होती. तसेच, पुण्यात वीकेंड लॉकडाउन कायम ठेवण्याचा निर्णय घेतला होता. पुण्याबाहेर पर्यटनास गेलेल्या लोकांना परत आल्यानंतर होम क्वारंटाइन करावे लागेल, असेही अजित पवार म्हणाले होते. मात्र, त्यांच्याच पुण्यातील सायंकाळी होत असलेल्या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी झाली होती. 

हेही वाचा : आढळरावांनी आतापासूनच सुरू केली आगामी लोकसभा लढविण्याची तयारी 

पुण्यातील या कार्यक्रमाच्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी केलेल्या गर्दीमुळे कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आले. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा  उडाला होता. कोरोनाच्या कोणत्याही नियमांचे पालन या ठिकाणी होत दिसले नाही. म्हणूनच झालेल्या गर्दी प्रकरणावर अजित पवारांकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली. 

अजित पवार म्हणाले की, कार्यालयाच्या कार्यक्रमास झालेली गर्दी पाहून गाडीतून उतरत असताना माझ्या मनात विचार आला की उद्‌घाटन न करताच तसच परत जावं. मी प्रशांतला (प्रशांत जगताप राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष) सांगितलं होतं की हा कार्यक्रम साधेपणाने करा. पण, माझी अवस्था आता धरताही येत नाही आणि सोडताही येत नाही, अशी झाली आहे. उदघाटनाचा कार्यक्रम न करताच मी तसाच परत गेलो असतो, तर कार्यकर्तेही नाराज झाले असते. त्यामुळे मी पुणेकरांची दिलगिरी व्यक्त करतो.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख