अजितदादांच्या सूचनेनुसार पृथ्वीराज जाचक 'छत्रपती'च्या कारभारात सहभागी 

गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बारामतीतील ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी जाचक व पवार कुटुंबीयांमध्ये सकारात्मक चर्चा घडवून आणली होती.
As per Ajit Dad's instructions, Prithviraj Jachak is active in the management of Chhatrapati sugar factory
As per Ajit Dad's instructions, Prithviraj Jachak is active in the management of Chhatrapati sugar factory

वालचंदनगर (जि. पुणे) : साखर संघाचे माजी अध्यक्ष आणि नुकतेच राष्ट्रवादी कॉंग्रेसशी जुळवून घेणारे पृथ्वीराज जाचक यांनी इंदापूर तालुक्‍यातील भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या कारभारात लक्ष घालण्यास सुरूवात केली आहे. कारखान्याचे माजी अध्यक्ष असलेले जाचक हे कारखान्यात होणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मुलाखती व संचालक मंडळाच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. 

ज्येष्ठ नेते शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी छत्रपती कारखान्याची सूत्रे जाचक यांच्याकडे देण्यास सुरूवात केल्याचे संकेत यातून मिळत आहेत. 

पृथ्वीराज जाचक यांनी 2003 मध्ये पवार कुटुंबीयांशी काडीमोड घेतला होता. त्यानंतर 2004 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी थेट शरद पवार यांच्या विरोधातच दंड थोपटले होते. तेव्हापासून कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत जाचक हे सत्ताधारी संचालक मंडळाच्या पॅनेलच्या विरोधात निवडणूक लढवत होते.

शेतकरी कृती समिती, शेतकरी संघटना आणि भारतीय जनता पक्षाच्या साहाय्याने त्यांनी पवार विरोधातील धार कायम ठेवली होती. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून विशेषतः राज्यात सत्ता बदल होऊन महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यापासून तीच धार थोडी बोथट झाल्याचे संकेत मिळत होते. 

गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बारामतीतील ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी जाचक व पवार कुटुंबीयांमध्ये सकारात्मक चर्चा घडवून आणली होती. त्यानंतर मुंबईमध्ये पृथ्वीराज जाचक, त्यांचा मुलगा आणि शरद पवार यांच्यामध्ये महत्वाची बैठक झाली. त्यानंतर जाचक यांनी पवार कुटुंबीयांसमवेत काम करण्याचा निर्णय घेतला होता. 

छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालक व इतर दहा पदाच्या मुलाखती होणार आहेत. त्यासाठी जाचक यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित राहण्याची सूचना केली आहे. पृथ्वीराज जाचक संचालक मंडळाच्या बोर्ड मिटींगला उपस्थित राहणार असून अधिकाऱ्यांच्या मुलाखतीही घेणार आहेत, अशी माहिती आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com