अजित पवारांनी इशारा दिल्यानंतर पोलिस यंत्रणा रात्रीच कामाला लागली

अजित पवार यांनी आदेश दिल्यानंतर बारामती तालुक्यात पोलिस यंत्रणा कशी खडबडून जागी होते, याचे उत्तम उदाहरण माळेगावकरांना पहावयास मिळाले.
0Ajit_20Pawar_26.jpg
0Ajit_20Pawar_26.jpg

माळेगाव : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आदेश दिल्यानंतर बारामती तालुक्यात पोलिस यंत्रणा कशी खडबडून जागी होते, याचे उत्तम उदाहरण माळेगावकरांना पहावयास मिळाले. उपविभागिय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या विशेष पोलिस पथकाने माळेगावात जुगार अड्ड्यावर धडक कारवाई केली. 

या कारवाईत ३२ जुगाऱ्यांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला. तर तब्बल ९ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यामध्ये १ लाख ७५ हजार रुपयांची रोकड मिळून आली. सात मोटारसायकली, एक फोरव्हीलर गाडी, मोबाईल, टेबल व खुर्चा, पंत्यांचा कॅट आदी वस्तू पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. अजित पवार यांनी तालुक्यातील अवैद्य व्यावसाय व गुन्हेगारीबाबत नुकतीच नाराजी व्यक्त केली होती. त्या पार्श्वभूमीवर शनिवारी (ता.४) रात्रीच्यावेळी पोलिसांनी माळेगावात केलेल्या धडक कारवाईला महत्व प्राप्त झाले आहे. याप्रकरणी पोलिस नाईक रमेश बाबुराव केकाण हेच फिर्यादी झाले आहेत. 

त्यांच्या फिर्यादिच्या आधारे आरोपी रमेश शंकर गायकवाड (रा. आमराई बारामती), बबलु ईश्वर माळे (रा. जिंतीनाका मलटण ता. फलटण जि. सातारा), वैभव रमेश जगताप (रा. मोरगाव सिध्दार्थनगर ता. बारामती), कल्याण मल्हारी सव्हाणे (रा. शेटफळगढे ता. इंदापुर), स्वप्निल उध्दव वाघमारे (रा. चंद्रमणीनगर बारामती), बबन भिकाजी जाधव ( रा. माळेगाव आदर्शनगर ता. बारामती), अक्षय भिमा निंबाळकर (रा. डोर्लेवाडी ता. बारामती), सुनिल धुमसेन सोनवणे (रा. पिंपरे खुर्द निरा ता. पुरंदर), विनोद भगवान काळे (रा. प्रबुध्दनगर आमराई बारामती), गणेश नाना बघाडे (रा. पोस्ट आॅफीस जवळ आमराई बारामती), महादेव यादव रणदिवे (रा. मोरगाव, ता. बारामती), सचिन रमेश कांबळे ( रा. गुणवडी ता. बारामती), विजय महादेव कांबळे ( रा. पोस्ट आॅफीस जवळ आमराई बारामती),

सिद्धार्थ सुरेश अहिवळे (रा. एस. टी. स्टॅंन्डसमोर आमराई बारामती), अल्फाज राजमोमंहद शेख (रा. सुहासनगर, आमराई बारामती), युवराज सुनिल गायकवाड ( रा. प्रबुध्दनगर आमराई बारामती), लक्ष्मण अर्जुन कदम (रा. कसबा पत्तीस पाय-या बारामती), अक्षय रामदास गायकवाड ( रा. अंथुर्णे मराठी शाळेजवळ ता. इंदापुर), जगन्नाथ सखाराम लकडे, अनिल विश्वनाथ धायगुडे,  धनंजय कृष्णा धायगुडे ( तिघे रा. निरा ता. पुरंदर), धिरज धनंजय जमजट, अकाश दिपक ढावरे (दोघे रा. पीडीसी बॅंकेचे मागे आमराई बारामती), संतोष नाथा काळे, सुनिल बबन भोसले, कैलास सुभाष कोलारे ( तिघे रा. माळेगाव ता. बारामती), भिमा दुर्गा निंबाळकर (रा. डोर्लेवाडी ता. बारामती), विक्रम अशोक अवधुते (रा. आमराई बारामती), सुरेश ताया शिंदे (रा. डोर्लेवाडी ता. बारामती), सुरेश अंनता भुजबळ , दिपक भरत पवार (दोघे रा. वाल्हे ता. पुरंदर), चंद्रकांत यशवंत कुचेकर (रा. मोरगाव वार्ड नंबर 4 ता. बारामती) इत्यादींचा समावेश आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com