आंबेगावमधील 30 ग्रामपंचायतींवर महिनाअखेर प्रशासक 

पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्‍यातील 30 ग्रामपंचायतीच्या सदस्यांची मुदत ऑगस्ट महिनाअखेर संपणार आहे. पण, कोरोना विषाणूच्या साथीमुळे या ग्रामपंचायतींची पंचवार्षिक निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. या ग्रामपंचायतीवर न्यायालयीन निर्णयानुसार प्रशासक म्हणून योग्य व्यक्तीऐवजी शासकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करावी लागणार आहे.
Administrator at the end of the month on 30 gram panchayats in Ambegaon
Administrator at the end of the month on 30 gram panchayats in Ambegaon

पारगाव (जि. पुणे) : पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्‍यातील 30 ग्रामपंचायतीच्या सदस्यांची मुदत ऑगस्ट महिनाअखेर संपणार आहे. पण, कोरोना विषाणूच्या साथीमुळे या ग्रामपंचायतींची पंचवार्षिक निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. या ग्रामपंचायतीवर न्यायालयीन निर्णयानुसार प्रशासक म्हणून योग्य व्यक्तीऐवजी शासकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करावी लागणार आहे. 

ऑगस्ट अखेर आंबेगाव तालुक्‍यातील 30 ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे. यातील ग्रामपंचायतींचा कार्यकाळ वेगवेगळ्या तारखेला संपत आहे. यामध्ये काही ग्रामपंचायतीचा कार्यकाळ 20 रोजी, तर काहींचा 22 ऑगस्ट रोजी संपुष्टात येणार आहे. तालुक्‍यातील वडगाव काशिंबेग या ग्रामंपचायतीवर प्रशासक नेमण्यात आलेला आहे. उर्वरीत 29 ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचे काम बाकी आहे. 

कोरोनाची साथ, त्यात काम करणारे शासकीय कर्मचारी आणि जिल्ह्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती पाहता उपलब्ध कर्मचाऱ्यांमधून प्रशासक नेमताना जिल्हा प्रशासनाला विविध ठिकाणी कसरत करावी लाणार आहे. 

आंबेगाव तालुक्‍यातील मंचर, महाळुंगे पडवळ, पिंपळगावतर्फे महाळुंगे, भराडी, अवसरी खुर्द, शेवाळवाडी, खडकवाडी, गावडेवाडी, साकोरे, भागडी, एकलहरे, चिंचोली, खडकी, लांडेवाडी-पिंगळवाडी, कोटमदरा-कोळवडी, कारेगाव, पेठ, वळती, लौकी, शिरदाळे, जवळे, काठापूर बुद्रुक, शिंगवे, गिरवली, थूगाव, काळेवाडी-दरेकरवाडी, रानमळा, धोंड माळ-शिंदेवाडी, कोलदरा-गोणवडी येथील ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नेमणूक होणार आहे. 

तालुक्‍यातील मोठ्या गावांत प्रशासक नेमताना प्रशासनाला कर्मचारी आणि गावकारभाऱ्यांमध्ये एक विचाराची सांगड घालावी लागणार आहे. मंचर, अवसरी खुर्द, महाळुंगे पडवळ, पेठ व पिंपळगाव यांसारख्या मोठ्या गावांत प्रशासक म्हणून अधिकाऱ्यास नेमताना प्रशासनाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. 

कोरोना साथीमुळे विद्यमान सरपंच, सदस्य मंडळींना मुदतवाढ मिळेल, अशी आशा होती. मात्र, नियमानुसार तशी मुदतवाढ देत येत नाही. त्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांच्या सूचनेनुसार या ग्रामपंचायतींची निवडणूक पुढे ढकलून त्या ठिकाणी प्रशासक नेमण्याचा निर्णय सरकारने घेतला.

प्रशासकपदी आपलीच वर्णी लागेल, असा विश्‍वास महाविकास आघाडीतील तीनही पक्षाच्या कार्यकर्त्यांना होता. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार मुदत संपणाऱ्या ग्रामंपचायतींवर प्रशासक म्हणून सरकारी अधिकाऱ्यांना नेमण्यात येणार आहे. त्यामुळे या तीनही पक्षाच्या कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला आहे. 

आंबेगाव पंचायत समितीतील बांधकाम विभागाचे शाखा अभियंता, अंगणवाडी पर्यवेक्षिका,  विस्तार अधिकारी आदींची  ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. 
-जालिंदर पठारे,गटविकास अधिकारी, आंबेगाव पंचायत समिती  


Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com