गाडीला धक्का लागला म्हणून अभिनेते महेश मांजरेकर यांची एकाला मारहाण...

अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्यावर मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गाडीला धक्का लागला म्हणून महेश मांजरेकर यांनी एका व्यक्तीला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे.
mhesh manjrekar.jpg
mhesh manjrekar.jpg

पुणे : अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्यावर मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गाडीला धक्का लागला म्हणून महेश मांजरेकर यांनी एका व्यक्तीला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे.

मांजरेकर यांच्या गाडीला आपल्या गाडीचा धक्का लागल्यावर त्यांनी आपल्याला शिविगाळ करत मारहाण केल्याची तक्रार कैलास सातपुते या व्यक्तीनं केली आहे. ही तक्रार पुणे जिल्ह्यातील यवत पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. त्यानंतर महेश मांजरेकर यांच्यावर यवत पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात. या घटनेचा व्हिडीअोही व्हायरल झाला आहे. 

शुक्रवारी रात्री राडे दहाच्या सुमारास पुणे-सोलापूर मार्गावर ही घटना घडली आहे. महेश मांजरेकर यांच्या गाडीला मागून येणार्या ब्रिझ्झा या गाडीनं धडक दिली. त्यानंतर मांजरेकर यांनी खाली उतरुन गाडीची पाहणी केली. त्यावेळी झालेल्या वादात मांजरेकर यांनी आपल्याला शिविगाळ करुन मारहाण केल्याचा आरोप कैलास सातपुते यांनी केला आहे. 

आपल्या पुढे गाडी चालवणार्या मांजरेकर यांनी अचनाक ब्रेक मारला. त्यामुळे आपली गाडी त्यांच्या कारला मागून धडकली. त्यानंतर मांजरेकर यांनी तू पिऊन गाडी चालवतो का असं म्हणत आपल्याला मारहाण केल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. मांजरेकर यावेळी नशेत असल्याचे तक्रारदाराने आपल्या तक्रारीत म्हलंय. या घटनेचा व्हिडीअो तक्रारदाराने सोशल मिडियावर शेअर केलाय. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com