संभाजी भिडे, एकबोटे यांच्यावर कारवाई करणार : गृहमंत्री देशमुख - Action will be taken against Sambhaji Bhide Ekbote Anil Deshmukh | Politics Marathi News - Sarkarnama

संभाजी भिडे, एकबोटे यांच्यावर कारवाई करणार : गृहमंत्री देशमुख

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 1 जानेवारी 2021

कोरेगाव भीमा प्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे आणि हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्यावर रीतसर कारवाई करण्यात येईल,'' असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. 

पुणे : ''कोरेगाव भीमा प्रकरणी चार्जशीटचा प्रस्ताव मंजूर केला आहे. याप्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे आणि हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्यावर रीतसर कारवाई करण्यात येईल,'' असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज येरवडा कारागृहाला भेट दिली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. देशमुख म्हणाले की येरवडा कारागृहात क्षमतेपेक्षा अधिक कैदी आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे जेलची क्षमता वाढविण्यासाठी प्रस्ताव दिला आहे. या कारागृहात वेगवेगळ्या प्रकारचे कैदी आहेत, त्यामुळे कारागृहाच्या रचनेचा विचार करण्यात येत आहे. याबाबत एक मॅाडेल तयार करण्यात आले आहे. त्यांचे सादरीकरण झालं आहे.  

अनिल देशमुख पोहोचले थर्टी फर्स्टसाठी पोलिस नियंत्रण कक्षात!
 सगळ्यांना वेध लागले होते काल  थर्टी फर्स्ट मोठ्या जल्लोषात साजरा करण्याचे. पण पोलिस मात्र 'थर्टी फर्स्ट'ची रात्र शांततेत पार पडावी, यासाठी सायंकाळपासूनच रस्त्यावर कडेकोड बंदोबस्त देत उभे असतात. नागरीकांचा आनंद द्विगुणीत करणाऱ्या याच पोलिसांना खंबीर मानसिक आधार देण्यासाठी गुरूवारी दस्तुरखुद्द गृहमंत्र्यांनीच पोलिस नियंत्रण कक्षात हजेरी लावली.रस्त्यावर बंदोबस्त करणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी "कोरोना काळातील कामाने तुम्ही नक्की थकला आहात, पण तुम्ही हिमतीने काम केले. यापुढे याच हिमतीने एकत्र लढत राहु आणि कोरोनामुक्त महाराष्ट्र" करु" अशा शब्दात पोलिसांना भक्कम विश्वास दिला !

सर्वसामान्य नागरीकांबरोबरच पोलिस कर्मचारी असो किंवा वरिष्ठ पोलिस अधिकारी. सगळ्यांमध्ये तितक्‍याच आत्मियतेने मिसळून त्यांच्याशी हितगुज साधत त्यांना मानसिक आधार देण्याची किमया गृहमंत्री अनिल देशमुख हे कायम साधतात. एखाद्या शहराचा दौरा करताना रस्त्यात बंदोबस्त करणाऱ्या पोलिसाचा वाढदिवस साजरा करणे असो किंवा कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवरील नाकेबंदीच्यावेळी पोलिसांमध्ये मिसळून त्यांच्यासमवेत चहा घेणे असो. कोरोनामुळे निधन झालेल्या पोलिस बांधवांच्या कुटुंबीयांशी भावनिक नाते निर्माण करण्यासाठीचे पत्र पाठविणे असो. अशा वेगवेगळ्या उदाहरणांमधून देशमुख यांनी आपल्या वैशिष्ट्यपुर्ण कामाची खासीयत पटवून दिलेली आहे. राज्यातील पोलिसांसाठी चांगले, अभिनव उपक्रम राबवितानाच पोलिसांकडे माणुकीच्या नात्याने पाहून त्यांच्यासाठी भरीव काम करण्याचे काम करणाऱ्या देशमुख यांनी २०२० च्या थर्टी फर्स्टच्या रात्री स्वतःच्या कुटुंबीयांसमवेत, मित्र मंडळी किंवा नातेवाईकांसमवेत घालवली नाही, तर थेट पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षात ठिक रात्री साडे अकरा वाजता उपस्थित राहून आपली आगळी वेगळी 'थर्टी फस्ट' साजरी केली.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख