...म्हणून मी पतीला खांद्यावर उचलून घेऊन विजयोत्सव साजरा केला ! 

पतीला प्रत्येकगोष्टीत खंबीरपणे साथ देणे, हे माझे आद्य कर्तव्य समजते.
The wife celebrated the victory by carrying her husband, who had won the Gram Panchayat elections, on her shoulders
The wife celebrated the victory by carrying her husband, who had won the Gram Panchayat elections, on her shoulders

पाईट (जि. पुणे) : कोणत्याही निवडणुकीत पत्नी विजय झाल्यावर आनंदाच्या भरात पती तिला उचलून घेऊन आनंदोत्सव साजरा करताना आपण अनेकदा पाहिले असेल. पण, खेड तालुक्‍यातील पाळू या गावातील रेणुका संतोष गुरव यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या आपल्या पतीला खांद्यावर उचलून घेत विजयोत्सव साजरा केला. त्यांच्या या अनोख्या सेलिब्रेशनची सर्वत्र चर्चा आहे. 

"ज्या प्रमाणे सुख-दुःखात पती आपल्या पत्नीला साथ देत असतो, अगदी त्याचप्रमाणे मीही माझ्या पतीच्या आनंदात सहभागी होत सुखात त्यांना साथ दिली,'' अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया रेणुका गुरव यांनी या सेलिब्रेशनंतर "सरकारनामा'शी बोलताना दिली. 

पाळू हे खेड तालुक्‍याच्या डोंगराळ भागातील गाव. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत रेणुका यांचे पती संतोष शंकर गुरव यांनी वॉर्ड क्रमांक एकमधून निवडणूक लढवली. या निवडणुकीत ग्रामस्थांनी त्यांना भरूभरून मते दिली. त्यांनी विरोधकाचा तब्बल 44 मतांनी पराभव केला. पती विजयी झाल्याचा आनंद रेणुका यांच्या गगनात मावेना त्यांनी चक्क आपल्या पतीला खांद्यावर उचलून घेत विजयोत्सव साजरा केला. उपस्थित नागरिकांनी त्याचा व्हिडिओ बनवला. तो आज (ता. 19 जानेवारी) दिवसभर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. 

रेणुका गुरव म्हणाल्या, "संतोष हे ज्या प्रमाणे मला संसारात, सुख-दुःखात साथ देत आहेत, त्याप्रमाणे मीदेखील माझे हे कर्तव्य समजून त्यांना आनंदाने उचलून घेतले. प्रत्येक पत्नी ही पतीची अर्धांगिनी असते, मग पतीला प्रत्येक चांगल्या गोष्टीत खंबीरपणे साथ देणे, हे माझे आद्य कर्तव्य समजते. त्यामुळे सुखाच्या या क्षणी मी माझे कर्तव्य पार पाडले.'' 

"सर्व गावकऱ्यांनी आम्हाला खूप साथ दिली, त्याप्रमाणे माझ्या पतीकडून गावची चांगली सेवा व्हावी, यासाठी मी या पुढील काळात आग्रही राहील आणि गावच्या विकासासाठी पतीला कायम साथ देत राहील,'' अशी भावनाही रेणुका यांनी "सरकारनामा'शी बोलताना व्यक्त केली. 

Edited by Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com