राष्ट्रवादीचे रविराज तावरेंवर यशस्वी शस्त्रक्रिया; प्रकृतीत सुधारणा : हल्लेखोर चौघांना अटक 

त्यावेळी आकाश मोरे व त्याच्या सहकाऱ्यांनी बुलेटवर येऊन रविराज यांच्या दिशेने गोळी झाडली होती.
Successful surgery on NCP activist Raviraj Taware
Successful surgery on NCP activist Raviraj Taware

माळेगाव (जि. पुणे) : राजकीय वैमनस्यातून गोळीबार झालेले राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रविराज तावरे यांच्यावर बारामतीत यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यांच्या छातीतून एक गोळी बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आले असून सध्या त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. (Successful surgery on NCP activist Raviraj Taware)  

दरम्यान, तावरे यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी तीन सराईत आरोपींसह एका अनोळखी युवक अशा चौघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी रविराज यांच्या पत्नी, जिल्हा परिषद सदस्या रोहिणी तावरे यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार प्रशांत पोपटराव मोरे, टॉम उर्फ विनोद पोपटराव मोरे, आकाश प्रशांत मोरे (सर्व रा. माळेगाव बुद्रूक, ता. बारामती) या चौघांना अटक करण्यात आली आहे.

बारामती तालुक्यातील माळेगाव-संभाजीनगर येथे सोमवारी (ता. ३१ मे)  सायंकाळी वडापाव आणण्यासाठी रविराज व त्यांच्या पत्नी रोहिणी तावरे या मोटारीतून गेल्या होत्या. त्यावेळी आकाश मोरे व त्याच्या सहकाऱ्यांनी बुलेटवर येऊन रविराज यांच्या दिशेने गोळी झाडली होती. त्यात तावरे हे जखमी झाले होते. त्यांना बारामतीतील भोईटे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर ह्‌द्‌यरोग तज्ज्ञ डॉ. सूरज चव्हाण यांनी मंगळवारी पहाटे यशस्वी शस्त्रक्रिया करून गोळी छातीतून बाहेर काढली आहे. त्यांना डॉ. पुरंदरे यांचेही सहकार्य लाभले. वैद्यकिय सूत्रांच्या म्हणण्यानुसार सध्या रविराज यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. 

राजकीय व आर्थिक फायदा मिळविणे, तसेच माळेगावात दहशत माजविण्याच्या उद्देशाने प्रशांत पोपटराव मोरे, टॉम उर्फ विनोद पोपटराव मोरे, आकाश प्रशांत मोरे (सर्व रा. माळेगाव बुद्रूक, ता. बारामती) यांच्यासह एक अनोळखी युवकाने पिस्तूलातून गोळी मारून माझ्या पतीला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, अशी तक्रार जिल्हा परिषद सदस्या रोहिणी तावरे यांनी फिर्यादीत म्हटले हेाते. त्यानुसार पोलिसांनी चौघांवर कारवाई केली आहे, अशी माहिती पोलिस निरिक्षक महेश ढवाण यांनी दिली. 

दरम्यान घटनेचे गांभीर्य पाहून पोलिस अधीक्षक अभिनव देखमुख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक मलिंद मोहिते, उपविभागिय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी घटनास्थळाला भेट देत तपासाबाबत सूचना केल्या होत्या.

मोकानुसार कारवाई होणार 

माळेगाव येथील जखमी रविराज यांच्यावर केलेल्या खुनी हल्ल्यातील आरोपी हे सराईत आहेत. त्यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे तालुका पोलिस ठाण्यात दाखल आहेत. या गावात राजकिय सत्ता संघर्षातून सातत्याने संघटीत गुन्हे घडले आहेत. गावातील ही संघटीत गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलिस अधीक्षक डा.अभिनव देशमुख यांनी संबंधित आरोपींवर मोका अंतर्गत कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार संबंधित गुन्हेगारांची माहिती गोळा करण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com