शरद पवार धावले सोलापूरच्या मदतीला; रेमडेसिव्हिरची ७५ इंजेक्शन उपलब्ध करून दिली

शरद पवार हे कायम सोलापूरच्या मदतीसाठी धावून येत असतात.
Sharad Pawar provided 75 injections of Remedisivir for Solapur
Sharad Pawar provided 75 injections of Remedisivir for Solapur

सोलापूर  ः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोलापूर जिल्ह्यातील गोरगरिब आणि गरजू कोरोनाबाधित रुग्णांसाठी रेमडेसिव्हिरची ७५ इंजेक्शन उपलब्ध करून दिली आहेत, अशी माहिती सोलापूरचे राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष महेश गादेकर यांनी दिली.

आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून त्यांनी रेमडेसिव्हिरची ७५ इंजेक्शनस दिली आहेत. शरद पवार यांचे सोलापूर जिल्ह्याशी १९७२ पासून ऋणानुबंध आहेत. त्यातूनच शरद पवार हे कायम सोलापूरच्या मदतीसाठी धावून येत असतात. त्यामुळेच कोरोनाच्या काळात सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील स्थिती लक्षात घेऊन पवार यांनी ही रेमडेसिव्हिरची इंजेक्शन उपलब्ध करून दिली आहेत, असे गादेकर यांनी सांगितले.

ासोलापूरसह राज्यभरात सध्या रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाइकांची ही इंजेक्शन मिळविण्यासाठी मोठ्या प्रमाणात दमछाक होत आहे. अशावेळी शरद पवार यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा शहर आणि जिल्ह्यातील कोरोनाबाधित गरजू आणि गरीब नागरिकांना फायदा होणार आहे. 

दरम्यान, रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी समिती स्थापन केली आहे. त्या समितीच्या माध्यमातून ह्या इंजेक्शनची विक्री आणि पुरवठ्यावर देखरेख ठेवली जाणार आहे.

महेश गादेकर म्हणाले की, राष्ट्रवादी वेल्फेअरच्या माध्यमातून उपलब्ध झालेली ही इंजेक्शन्स आम्ही वाटप करणार नाही तर ती सोलापूरचे जिल्हाधिकारी आणि महापालिकेचे आयुक्त यांना विभागून देणार आहोत. तशी पूर्वकल्पना आम्ही सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी दिलेली आहे. ही इंजेक्शन्स प्रशासनाकडून गरजू आणि गरीब रुग्णांना वाटप केली जातील. यात कोणत्याही पक्षाचा अथवा पदाधिकाऱ्याचा कोणताही संबंध असणार नाही. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com