Breaking News : संभाजी भिडे सात वर्षांनंतर वढूमध्ये 

तेथे थांबण्यास मज्जाव केल्याने ते तत्काळ निघून गेले.
Sambhaji Bhide came to Vadu Budruk after seven years
Sambhaji Bhide came to Vadu Budruk after seven years

शिक्रापूर (जि. पुणे) : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे हे तब्बल सात वर्षांनंतर आज (ता.9 जानेवारी) वढु बुद्रूक (ता. शिरूर) येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधिस्थळाच्या दर्शनासाठी आले होते.

शिक्रापूर पोलिसांना याबाबतची माहिती कळताच पोलिसांनी त्यांना तेथे थांबण्यास मज्जाव केल्याने ते तत्काळ निघून गेले. वाजेवाडी (ता. शिरूर) येथील एका दुर्घटनाग्रस्त कुटुंबाला भेटून ते पुन्हा पुण्याच्या दिशेने गेले. 

कोरेगाव भीमा दंगलीनंतर राज्यभर सर्वाधिक चर्चेत असलेले शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे हे दंगलीपूर्वी सहा वर्षे या भागात आलेले नव्हते. मात्र, आज दुपारी साडेचारच्या सुमारास ते वढु बुद्रूक येथील छत्रपती संभाजी महाराज समाधिस्थळी काही मोजक्‍या कार्यकर्त्यांसमवेत पोचले. 

शिक्रापूर पोलिसांना याबाबतची माहिती समजताच त्यांनी थेट छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळ गाठले. या ठिकाणी भिडे हे थांबलेले पाहून त्यांना त्या ठिकाणी थांबण्यास मज्जाव केला. त्या नंतर भिडे हे तत्काळ निघाले. तेथून ते वाजेवाडी (ता. शिरूर) येथे आले. काही दिवसांपूर्वी एका अपघातात मृत्यू पावलेले अमित तिखे यांच्या कुटुंबीयांना भेटले आणि पुण्याकडे पुन्हा मार्गस्थ झाले. 

शिक्रापूर पोलिसांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आम्ही छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळाच्या बाबतीत संवेदनशील व सतर्क आहोत. शिक्रापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतली प्रत्येक गोपनीय माहिती संकलीत करून त्यावर कार्यवाही केली जात असल्याचे पोलिस निरीक्षक उमेश तावसकर यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com