पुणे जिल्ह्यातल्या आदिवाशी क्षेत्रात मनरेगाची कामे सुरु करा : डाॅ. अमोल कोल्हे

पुणे जिल्ह्यात जुन्नर, आंबेगाव आणि खेड या तालुक्यात असलेल्या आदिवासी भागातल्या नागरिकांना रोजगार मिळण्यासाठी मनरेगा अंतर्गत सार्वजनिक व वैयक्तिक लाभाची कामे सुरु करण्याची मागणी खासदार डाॅ. अमोल कोल्हे यांनी केली आहे
NCP MP Amol Kolhe Wants MGNREGA Works in Pune District
NCP MP Amol Kolhe Wants MGNREGA Works in Pune District

पुणे : जिल्ह्यात जुन्नर, आंबेगाव आणि खेड या तालुक्यात असलेल्या आदिवासी भागातल्या नागरिकांना रोजगार मिळण्यासाठी मनरेगा अंतर्गत सार्वजनिक व वैयक्तिक लाभाची कामे सुरु करण्याची मागणी खासदार डाॅ. अमोल कोल्हे यांनी केली आहे. 

पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे त्यांनी पत्राद्वारे ही मागणी केली. देशभरात कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यामुळे संपूर्ण देशभरात अर्थचक्र थंडावले. आता चवथ्या टप्प्यातील लाॅकडाऊनचे अखेरचे काही दिवस आहेत. अनेक ठिकाणी लाॅकडाऊनमध्ये शिथिलता दिली जाऊन दैनंदिन व्यवहार सुरु झाले आहेत. त्यातच ग्रामीण भागातले अर्थचक्र सुरु करण्यासाठी मनरेगा अंतर्गत रस्ते, गावतळी, वृक्ष लागवडीसारखी कामे सुरु करावीत, असे आदेश शासनाने दिले आहेत. त्यानुसार पुणे जिल्ह्यातील आदिवासी क्षेत्रात मनरेगाची कामे सुरु करण्याची मागणी डाॅ. कोल्हे यांनी केली आहे. 

आदिवासी भागात पावसाळा सुरु होण्यापूर्वी मनरेगा अंतर्गत येणारी कामे सुरु केल्यास आदिवासींना रोजगार मिळेल व त्यातून गेल्या दोन महिन्यांपासून थंडावलेल्या अर्थचक्राला गती मिळेल, यासाठी आपण जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांना पत्र पाठवले असून त्यात जुन्नर, आंबेगाव व खेड तालुक्याच्या गटविकास अधिकाऱ्यांना मनरेगाची कामे त्वरीत सुरु करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी केल्याचे डाॅ. कोल्हे यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com