एकोणीस वर्षे मंत्री राहूनही केवळ नौटंकीच केल्यामुळे हर्षवर्धन पाटलांना जनतेने घरी बसवले 

...तर जनता मलाही जाब विचारेल, मलाही घरी बसवेल.
Minister of State Dattatreya Bharane's criticism of former Minister Harshvardhan Patil
Minister of State Dattatreya Bharane's criticism of former Minister Harshvardhan Patil

इंदापूर (जि. पुणे) : राज्यातील शेतकरी सध्या वीज कनेक्‍शन तोडणीमुळे आर्थिक संकटात आले आहेत. मात्र वीज कनेक्‍शन तोडण्याबाबतचे धोरण लवचिक असावे. शेतकऱ्यांना वीजबिल भरण्यासाठी हप्ते करून द्यावेत. यासंदर्भात ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत सकारात्मक व्हावेत, यासाठी आपण शेतकरी म्हणून प्रयत्न केले. ऊर्जामंत्री लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय घेतील, अशी अपेक्षा ठेवूयात, असे वक्तव्य सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी केले. 

शेतकऱ्यांच्या वीज कनेक्‍शन तोडणीबाबत आपले सूचक मौन का? या प्रश्नावर सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी वरील उत्तर दिले. ते इंदापुरात बोलत होते. 

या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, इंदापूर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, तालुका कार्याध्यक्ष अतुल झगडे, इंदापूर शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्ष छाया पडसळकर, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष शुभम निंबाळकर, कार्याध्यक्ष सचिन खामगळ, नवनाथ रुपनवर, अक्षय कोकाटे, हामा पाटील, राजाभाऊ गोलांडे उपस्थित होते. 

"राज्याच्या मंत्रिमंडळात ज्यांनी 19 वर्षे काम केले, त्यांनी त्या काळात केवळ नौटंकीच केल्यामुळे जनतेने सलग दोन विधानसभा निवडणुकीत त्यांना घरी बसवले. त्यामुळे सध्या त्यांनी निवांतपणे घरी बसावे. ते माझ्यापेक्षा वयाने, अनुभवाने मोठे आहेत. त्यांनी आम्हास आशीर्वाद द्यावा. आमचे बरोबर नाही, असे वाटत असेल तर त्यांनी लक्षात आणून द्यावे, त्यांचा सल्ला प्रामाणिक असेल तर तो आम्ही नक्की स्वीकारू. मात्र, विकासाच्या कामाच्या त्यांनी आडकाठी आणू नये,'' अशा शब्दांत राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी नाव न घेता माजी सहकार मंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्यावर हल्लाबोल केला. 

भरणे म्हणाले की, इंदापूरची जनता हुशार आहे. कोण नुसतं बोलतंय, कोण काम करतंय, हे त्यांना सांगण्याची गरज नाही. केवळ भाषण करून, पाठीवर थाप टाकून पेपरला बातमी लावून नौटंकी करून चालत नाही, तर प्रामाणिकपणे काम करावे लागते. राजकारणात कोणीही ताम्रपट घेऊन येत नाही. त्यांनी काम केले नाही; म्हणून जनतेने त्यांना घरी बसवले आहे. जनतेस माझे काम आवडले नाही, तर जनता मलाही जाब विचारेल, मलाही घरी बसवेल, असा उपरोधिक टोला राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी विरोधक हर्षवर्धन पाटील यांना लगावला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com