Jayant Patil Say I Built Ram Mandir Before BJP's Demand | Sarkarnama

भाजपच्या आधी मी रामाचे मंदीर बांधले : जयंत पाटील

संपत मोरे
रविवार, 26 जुलै 2020

भारतीय जनता पक्षाने राम मंदिराची मागणी करण्याच्या अगोदर माझ्या मतदारसंघांमध्ये मी रामाचे मंदिर बांधले आहे. आज गरज आहे ती देशाला कोरोनामुक्त  करण्याची. त्यामुळे आज सर्वांनी एकत्रितपणे लढण्याची गरज आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे

पुणे : भाजपने राम मंदिराची मागणी करण्याअगोदर मी माझ्या मतदारसंघांमध्ये रामाचे मंदिर बांधले आहे. आमचाही देवावर विश्वास आहे. मात्र, आज आरोग्याला प्राधान्य देण्याची गरज  आहे. आज मंदिरापेक्षा आरोग्यावर लक्ष देण्याची गरज आहे." असे मत जलसंपदा मंत्री,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना व्यक्त केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी राम मंदिराच्या संदर्भाने विधान केल्यानंतर सगळीकडे त्याची चर्चा सुरू आहे. शरद पवार यांना 'जय श्रीराम' असे लिहून पत्र पाठवण्याची मोहीम भाजपच्या कार्यकर्त्यांनी सुरू केली आहे तर पुरोगामी विचारांचे कार्यकर्ते आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते शरद पवार यांच्या बाजूने उभे राहिले आहेत.

माध्यमांशी बोलताना जयंत पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली ते म्हणाले, "भारतीय जनता पक्षाने राम मंदिराची मागणी करण्याच्या अगोदर माझ्या मतदारसंघांमध्ये मी रामाचे मंदिर बांधले आहे. आज गरज आहे ती देशाला कोरोनामुक्त  करण्याची. त्यामुळे आज सर्वांनी एकत्रितपणे लढण्याची गरज आहे,''

ते पुढे म्हणाले, "आमचाही देवावर विश्वास आहे. आम्ही देव मानतो. पण आज आपल्या सगळ्यांवर कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे सगळ्यांनी कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी लक्ष देण्याची गरज आहे. कोरोना या संकटातून आपण बाहेर पडल्यानंतर मंदिर बांधायला काही हरकत नाही. मग लोकही त्या वेळेला मंदिराचा कार्यक्रम हाती घेणाऱ्या लोकांना साथ देतील." 
Edited By- Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख