दादांचा फोन...आणि 'त्या' डाॅक्टरची अरेरावी संपली!

आळेफाटा येथे अडवणूक करणाऱ्या एका डॉक्टरांची तक्रार शिंदे यांनी अजित दादांच्याकडे केली. दादांच्या फोनमुळे डॉक्टरने अरेरावीची भाषा बंद केली आणि संबंधित रुग्णाला तातडीने डिस्चार्जही दिला
Ajit Pawar Helped Patient to get Discharge from Hospital
Ajit Pawar Helped Patient to get Discharge from Hospital

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचा मोबाईल फोन याची नेहमीच चर्चा होते. राज्यातील शेकडो लोकांना दादांच्या फोनमुळे न्याय मिळाला आहे. जेव्हा सगळे पर्याय खुंटतात तेव्हा लोक अजितदादांचा मोबाईल नंबर डायल करतात. त्यांना फोन केल्यावर नक्क्की काम मार्गी लागते असा अनेकांचा अनुभव आहे. असाच एक अनुभव आळकुटे येथील विशाल शिंदे यांना आला. आळेफाटा  येथे अडवणूक करणाऱ्या एका डॉक्टरांची तक्रार शिंदे यांनी अजित दादांच्याकडे केली. दादांच्या फोनमुळे डॉक्टरने अरेरावीची भाषा बंद केली.

'सरकारनामा' प्रतिनिधीने विशाल शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, "माझ्या मित्राच्या बहीणीला प्रसूतीसाठी आळेफाटा येथील एका डाॅक्टरांच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. महात्मा फुले जन आरोग्य योजने मार्फत विनामूल्य प्रसूती व इतर सेवा उपलब्ध असताना संबंधित डाॅक्टर वारंवार पैशाची मागणी करत होते. तसेच  रुग्णाला घरी सोडण्यास अडवणूक करत होते.तेथील आरोग्यमित्रही डॉक्टरांनाच मदत करत होते. याबाबत जाब विचारला असता यांनी २५ हजार रुपये भरा आणि मगच रुग्णाला घरी न्या.असे सांगितले. पैसे दिल्याशिवाय मी घरी जाऊ देणार नाही असे ते म्हणाले,''

ते पुढे म्हणाले, "आमच्याकडे पैसे नव्हते. शिवाय ते आमच्याकडे बेकायदेशीर रित्या पैसे मागत होते. मग मी अजितदादांचा मोबाईल नंबर मिळवून त्यांना कॉल केला. दादांनी माझी कैफियत ऐकली आणि मला म्हणाले 'डॉक्टरला फोन दे,' मी दवाखान्याजवळ नव्हतो. मी फोन घेऊन दवाखान्यात गेलो आणि माझ्या आणि दादांच्या फोनचे ऑडिओ रेकॉर्ड डॉक्टरांना ऐकवले. ते ऐकल्यावर त्यांनी रुग्णाला लगेच डिस्चार्ज दिलाच आणि अॅडमिट करताना घेतलेले तीन हजार रुपये परत दिले."

"मी राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता नाही.राजकारणापासून दूर असलेला सामान्य तरुण आहे पण मला आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या कामाची पद्धत कळाली. राष्ट्रवादी ताकद महाराष्ट्राची असं गीत मी ऐकले होते. त्याचा प्रत्यय मला आला आहे. एका गरीब कुटुंबाला मदत करणारे अजितदादांच्या सारखे नेते हे आपल्या राज्याचे भूषण आहेत."असे शिंदे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com