डिपॉझिट जप्त झाले; तरी आमदार झालो : गोपीचंद पडळकर 

2012 मध्ये सांगली जिल्हा परिषद लढलो; पण अख्खा पॅनेल पडला.
Deposits confiscated in elections; Still became an MLA: Gopichand Padalkar
Deposits confiscated in elections; Still became an MLA: Gopichand Padalkar

टाकळी हाजी (जि. पुणे) : निवडणुका लढण्याचा चांगला अनुभव मला आहे. मी 2009 पासून निवडणुका लढवतोय. पडताये. विधानसभेची निवडणूक मी बारामतीतून लढलो आणि पुन्हा पडलो...नुसता पडलो नाही; तर डिपॉझिट जप्त झाले. अखेर भाजपने मला विधान परिषदेवर संधी देऊन आमदार केले. त्यामुळे निवडणूक ही एक संधी आहे, हे देखील लक्षात ठेवा, असा सल्ला भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी कार्यकर्त्यांना दिला. 

कवठे येमाई (ता. शिरूर) येथे ग्रामस्थांच्या वतीने आमदार पडळकर यांचा सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. या वेळी माजी पंचायत समिती सदस्य डॉ. सुभाष पोकळे, माजी सरपंच अरूण मुंजाळ, रामदास सांडभोर, अर्जुन मुखेकर, अर्जुन सांडभोर, उत्तम जाधव आदी ग्रामस्थ उपस्थित होते. 

पडळकर म्हणाले, "निवडणुका लढण्याचा चांगला अनुभव मला आहे. मी 2009 मध्ये विधानसभा लढलो आणि पडलो, त्यानंतर 2012 मध्ये सांगली जिल्हा परिषद लढलो; पण अख्खा पॅनेल पडला. पुन्हा 2014 मध्ये आमदारकी लढलो; नरेंद्र मोदींची हवा होती, तरीही पडलो. लोकसभेची निवडणूक 2019 मध्ये लढवली. या निवडणुकीत 3 लाख 234 मते पडली, तरीही पडलो, त्यानंतर विधानसभेची निवडणूक बारामतीतून लढलो. पुन्हा पडलो...नुसता पडलो नाही; तर डिपॉझिट जप्त झाले.'' 

"ग्रामपंचायत निवडणूक संपल्यावर एकत्रित येऊन ग्रामविकासावर चर्चा करा. त्यातून गावच्या विकासासाठी जबाबदारी घेणारे उत्तम नेतृत्व ग्रामस्थांनी निवडावे. माझ्याशी संपर्क करा, राज्यातील कोणत्याही सर्वसामान्यांच्या समस्या विधान परिषदेत मांडणार. नुसत्या मांडणार नसून महाविकास आघाडी सरकारच्या मुंडक्‍यावर बसून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याचे काम करणार आहे,'' अशी ग्वाही पडळकर यांनी दिली. 

"कार्यकर्त्यांनी भाजपबरोबर काम करावे. मी सर्वसामान्यांच्या समस्या विधान परिषदेत मांडून सोडविण्याचा प्रयत्न करेल. भविष्यात आमदार निधीतून आपल्या गावाला काही ना काही निधी उपलब्ध करून देणार आहे, त्यासाठी कार्यकर्त्यांनी पाठपुरावा करावा,'' असे आवाहन पडळकर यांनी कवठे येमाई ग्रामस्थांना केले. 

पडळकर म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व जगाने मान्य केले आहे. केंद्राने कोरोनाच्या काळात सर्वसामान्यांपर्यंत पाठवलेली मदत ही मोलाची होती. शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारने घेतलेले निर्णय अतिशय महत्वाचे असून त्यातून शेती व्यवसायाला भरभराटी येणार आहे.'' 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com