माळेगाव कारखान्यापाठोपाठ सांगवी ग्रामपंचायतमध्येही चंद्रराव तावरे गटाचा पराभव  - Defeat of Chandrarao Taware group in Sangvi: Power of Gram Panchayat to NCP after twenty years | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पूजा चव्हाण मृत्यप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा

माळेगाव कारखान्यापाठोपाठ सांगवी ग्रामपंचायतमध्येही चंद्रराव तावरे गटाचा पराभव 

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 19 जानेवारी 2021

राष्ट्रवादीने सत्तेचे एक वर्तुळ पूर्ण केले आहे.

सांगवी (जि. पुणे) : बारामती तालुक्याचे लक्ष लागलेल्या सांगवी ग्रामपंचायतीत 20 वर्षांनंतर सत्ता परिवर्तन झाले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे एकेकाळचे सहकारी आणि पाच वर्षापूर्वी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे यांच्या गटाकडे असलेली ग्रामपंचायतीची सत्ता आता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ताब्यात आली आहे. माळेगाव सहकारी साखर कारखान्याची सत्ता तावरे गटाकडून हिसकावून घेतल्यानंतर आता ग्रामपंचायतही चंद्रराव तावरे यांच्याकडून ताब्यात घेत राष्ट्रवादीने सत्तेचे एक वर्तुळ पूर्ण केले आहे.

सांगवी ग्रामपंचायतीच्या 15 जगांपैकी 10 जागांवर आपले उमेदवार उच्चांकी मतांनी निवडून आणून राष्ट्रवादीने भाजपला मोठा धक्का दिला आहे. ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे यांची माळेगाव साखर कारखान्याची सत्ता हस्तगत करत राष्ट्रवादीने पुन्हा वर्चस्व प्रस्थापित करण्यास सुरुवात केली होती. ती आता ग्रामपंचायत निवडणुकीत चंद्रराव तावरे यांच्या ताब्यात असलेली गावची सत्ताही हिसकावून घेत राजकीय वर्चस्वाचे वर्तुळ पूर्ण केले आहे. 

राजकीयदृष्टया महत्व असणाऱ्या सांगवीत काही प्रभागात दुरुंगी, तिरंगी, तर काही ठिकाणी चौरंगी लढत पहायला मिळाली. दोन्ही गटांत विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली गेली. निवडणुकीदरम्यान काहींनी भाजपमधून बाहेर पडत राष्ट्रवादीला साथ दिल्याने भाजपला विशेषतः चंद्रराव तावरे यांना आपला गड राखता आला नाही. 

चंद्रराव तावरे यांचा श्री भैरवनाथ पॅनेल आणि राष्ट्रवादीचे प्रकाश तावरे, माळेगाव साखर कारखान्याचे संचालक अनिल तावरे, शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे विश्वस्त महेश तावरे, संजय गांधी निराधार योजनेचे माजी तालुका अध्यक्ष किरण तावरे यांचा श्री भैरवनाथ ग्रामविकास पनेल यांच्यात लढत होती. यामध्ये राष्ट्रवादीचे 10 उमेदवार निवडून आले आहेत, तर भाजपचे 5 उमेदवार निवडून आले असून भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. 

राष्ट्रवादीच्या पॅनेलमधून अनिल काळे, छाया तावरे, चंद्रकांत तावरे, कमल गायकवाड, पौर्णिमा लोंढे, नीलिमा जगताप, विजय तावरे, विलास आडके, स्वाती तावरे, प्रणव तावरे हे उमेदवार निवडून आले.

भाजप पुरस्कृत पॅनेलमधून अनिल तावरे, सिद्धार्थ जगताप, अनिता तावरे, विठाबाई एजगर, स्वाती वाघ हे उमेदवार निवडून आले आहेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख