तुम्ही चंपा, टरबुजा म्हटलेले चालते का? चंद्रकांत पाटलांचा राष्ट्रवादीला सवाल 

शरद पवार यांच्याबाबत मला तसे बोलायचे नव्हते.
Chandrakant Patil's question to NCP while giving explanation about the criticism on Sharad Pawar
Chandrakant Patil's question to NCP while giving explanation about the criticism on Sharad Pawar

पुणे : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्याविषयी तुम्ही काहीही बोलता. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टरबूज्या, तर मला चंपा म्हणता, हे चालते का? असा सवाल करीत, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत तसे बोलायचे नव्हते असे सांगत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पवार यांच्यावरील टीकेबाबत आपली बाजू मांडली. 

पाटील म्हणाले, "या सर्व विषयाबाबत मी माझी भूमिका मांडली. माझ्यासाठी हा विषय संपला आहे,' तरीही त्यांना बोलायचे असेल, तर बोलू देत,' असे सांगून पाटील यांनी टीकेच्या वादावर पडदा टाकला. उपमुख्यमंत्री अजित पवार जनतेच्या प्रश्‍नावर बोलायला तयार नाहीत. त्यांना वेळ नाही. मात्र, पवार यांच्यावरील टीकेबाबत बोलायला त्यांना वेळ आहे, असे त्यांनी सांगितले. 

पदवीधर-शिक्षक मतदारसंघातील राजकीय समीकरणे, पवार यांच्यावरील टीका आणि त्यानंतर झालेले ट्रोलिंग याबाबत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, "पवार यांच्याबाबत मला तसे बोलायचे नव्हते. मात्र, कोणत्याही विषयावरून ट्रोल केले जाते. अशा ट्रोलिंगला मी अजिबात घाबरत नाही.'' 

परप्रांतीयांबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपल्या भूमिकेत बदल केल्यास त्यांना सोबत घेण्याबाबत विचार होऊ शकतो, असे पाटील यांनी या वेळी स्पष्ट केले. राज्यातील विविध विषयांवर राज ठाकरे तळमळीने बोलत असतात. त्यांनी अनेकवेळा चांगल्या भूमिका घेतल्या आहेत. मात्र, परप्रांतीय बांधवांबाबत त्यांनी आपल्या भूमिकेत बदल करण्याची गरज आहे, तरच त्यांच्याबाबत भाजप निर्णय घेऊ शकते, अस पाटील यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com