Breaking News : भाजपचे नेते कल्याणराव काळे राष्ट्रवादीत प्रवेश करणार : जयंत पाटलांबरोबर बैठक  

कल्याणराव काळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यातदुपारी बैठक होणार आहे.
Breaking News BJP leader Kalyanrao Kale to join NCP: Meeting with Jayant Patil
Breaking News BJP leader Kalyanrao Kale to join NCP: Meeting with Jayant Patil

पंढरपूर : सोलापूर जिल्ह्याच्या पंढरपूर तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे नेते आणि सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे. काळे गटाच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्यामध्ये राष्ट्रवादीत प्रवेश करायचे ठरले असल्याचे संकेत मिळाले आहेत.

दरम्यान, शनिवारी दुपारी कल्याणराव काळे आणि राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यात भेट होणार आहे. त्या वेळी ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

मागील लोकसभा निवडणुकीदरम्यान कल्याणराव काळे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वावर टीका करत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला होता. अवघ्या दीड वर्षानंतर काळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे.

कल्याणराव काळे यांच्याकडे दोन साखर कारखाने, पतसंस्था आणि शैक्षणिक संस्थांचे जाळे आहे. यापूर्वी काळे काँग्रेसमध्ये होते. पक्षात घुसमट होत असल्याचे सांगून 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेनेने उमेदवारी नाकारल्यानंतर अवघ्या काही तासांतच त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत काँग्रेसचा हात पुन्हा धरला होता. त्यावेळी काळे यांनी काँग्रेसकडून माढा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत त्यांनी 55 हजाराहून अधिक मते घेतली होती. 

त्यानंतर 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान कल्याण काळे यांनी काँग्रेसचा हात सोडून हाती कमळ घेतले होते. परंतु त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि राज्यात पुन्हा शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचे सरकार आले. त्यामुळे काळे यांची गोची झाली होती. आधीच अडचणीत असलेल्या त्यांच्या दोन्ही साखर कारखान्यांना मदत झाली नाही, त्यामुळे काळे यांची आर्थिक कोंडी झाली आहे.

दरम्यान, सध्या पंढरपूर विधानसभेची पोटनिवडणूक लागली आहे. हीच संधी साधून काळे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. कल्याणराव काळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात शनिवारी दुपारी बैठक होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com