अजितदादांना लहानपणी शाळेत सोडणाऱ्या जालिंदर काकांचं निधन,,,,,, - Baramati Ajit Pawar Becomes Sentimental | Politics Marathi News - Sarkarnama

अजितदादांना लहानपणी शाळेत सोडणाऱ्या जालिंदर काकांचं निधन,,,,,,

मिलिंद संगई
शुक्रवार, 9 एप्रिल 2021

कायमस्वरुपी पवार कुटुंबियांप्रती असलेली निष्ठा जपलेल्या काटेवाडी (ता. बारामती) येथील जालिंदर शेंडगे यांनी बुधवारी (ता. 7) अंतिम श्वास घेतला. पवार कुटुंबियांतील अनेकांची सेवा केलेल्या आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कधी काळी सायकलवरुन शाळेपर्यंत पोहोचविलेल्या जालिंदरकाका यांच्या आजारपणात स्वत: अजित पवार यांनी लक्ष घातले होते.

बारामती : कायमस्वरुपी पवार कुटुंबियांप्रती असलेली निष्ठा जपलेल्या काटेवाडी (ता. बारामती) Baramati येथील जालिंदर शेंडगे यांनी बुधवारी (ता. 7) अंतिम श्वास घेतला. पवार कुटुंबियांतील अनेकांची सेवा केलेल्या आणि उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांना कधी काळी सायकलवरुन शाळेपर्यंत पोहोचविलेल्या जालिंदर यांच्या आजारपणात स्वत: अजित पवार यांनी लक्ष घातले होते. त्याच्यावर सर्वोत्तम उपचार व्हावेत म्हणून स्वताः पवार यांनी आपले स्वीय सहायक सुनीलकुमार मुसळे यांच्यावर जबाबदारी सोपवली होती. Baramati Ajit Pawar Becomes Sentimental

मात्र अखेर नियतीने जालिंदर यांना अलविदा करण्याचे काम केले. पवार कुटुंबियांसोबत प्रारंभापासून असलेले जालिंदर पडेल ते काम करत असत. स्वताः अजित पवार यांना त्यांच्या लहानपणी सायकलवरुन शाळेत सोडण्यापासून ते दूध काढणे, गोठा स्वच्छ करण्यापासून ते शेतीचीही अनेक कामे त्यांनी अनेक वर्षे इमाने इतबारे केली. 

फेब्रुवारी महिन्यात जालिंदर यांची प्रकृती नाजूक बनली होती. ही बाब सुनीलकुमार मुसळे यांना समजल्यावर त्यांनी अजित पवार यांना याची माहिती दिली. त्या नंतर पवार यांनी स्वताः त्यांच्यावर उपचार व्हावेत या साठी डॉक्टरांशी चर्चा केली.  Baramati Ajit Pawar Becomes Sentimental

उपचारात कसलीही कमतरता भासू नये याची तजवीज स्वत: पवार यांनी केली. लहानपणी ज्याच्या अंगाखांद्यावर खेळलो, लहानाचे मोठे झालो, त्या जालिंदर यांच्या प्रती अजित पवार यांची असलेली आपुलकी आणि जिव्हाळा या निमित्ताने समोर आला. एरवी कडक असलेले अजितदादा जेव्हा कुणावर अशी वेळ येते तेव्हा किती हळवे होतात हेच या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखीत झाले. 

Edited Bt - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख