दिवंगत कार्यकर्त्यांच्या लेकीचे बच्चू भाऊंनी केले कन्यादान!

अनेकदा राजकीय कार्यकर्त्यांच्या वाटयाला उपेक्षा येते. कार्यकर्त्यांच्या कुटूंबाची ससेहोलपट होते.कार्यकर्त्यांच्या पश्चात तर नेत्यांनी कुटुंबाकडे दुर्लक्ष केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.पण कार्यकर्ते सांभाळण्याचा, त्यांच्या सुखदुःखात पाठीशी राहण्याचा राज्यमंत्री बच्चू कडू यांचा पॅटर्न वेगळा आहे
Bacchu Kadu Stood up as Father in Supporters Daughter Wedding
Bacchu Kadu Stood up as Father in Supporters Daughter Wedding

पुणे : राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या अचलपुर रायपुरा येथील सुधीर डकरे यांच्या कन्येच्या विवाहाचे कन्यादान स्वतः बच्चूभाऊंनी उपस्थित राहून केले. डकरे यांनी राज्यमंत्री कडू यांना जी अनमोल साथ दिली होती.त्यांच्या ऋणानुबंधची जाणीव ठेवत त्यांच्या पश्चात ते नेहमीच या कुटुंबाच्या सोबत राहिले. आज जेव्हा त्यांची कन्या सासरी नांदायला निघाली तेव्हा बच्चूभाऊ आणि त्यांच्या पत्नी प्रा. नयना कडू दोघेही गहिवरून गेले.

सुधीर डकरे हे बच्चू कडू यांचे कट्टर कार्यकर्ते. ते नेहमीच भाऊंच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्यासोबतच्या उपक्रमात सहभागी असायचे. २०१४ मध्ये सुधीर डकरे चा आकस्मिक मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबावर मोठे संकट कोसळले मात्र बच्चू कडू यांनी या कुटुंबाला नेहमी धीर दिला. अडचणीच्या प्रसंगात त्यांच्या सोबत उभे राहिले.

अनेकदा राजकीय कार्यकर्त्यांच्या वाटयाला उपेक्षा येते. कार्यकर्त्यांच्या कुटूंबाची ससेहोलपट होते.कार्यकर्त्यांच्या पश्चात तर नेत्यांनी कुटुंबाकडे दुर्लक्ष केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.पण कार्यकर्ते सांभाळण्याचा, त्यांच्या सुखदुःखात पाठीशी राहण्याचा राज्यमंत्री कडू यांचा पॅटर्न वेगळा आहे.

सुधीर डकरे यांच्या मुलीचा विवाह होता या विवाहास स्वतः ना. बच्चु कडू व त्यांची पत्नी प्रा. नयना कडू या हजर होत्या.त्यानी स्वतः वैष्णवीचे त्यांनी कन्यादान केले. हे दृष्य बघून लग्न मंडपात भावुक वातावरण निर्माण झाले होते. वैष्णवीचा विवाह अमरावती देऊरवाडा येथील अमोल दातीर यांच्यासोबत झाला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com