पुण्यात कोरोना का वाढतोय; कोण कमी पडतेय? अजित पवारांनी बोलावली बैठक - Ajit Pawar to take Meeting of Pune Elected Representatives today | Politics Marathi News - Sarkarnama

पुण्यात कोरोना का वाढतोय; कोण कमी पडतेय? अजित पवारांनी बोलावली बैठक

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 22 मे 2020

अजितदादांच्या समवेत दुपारी चार वाजता आमदार आणि सर्व खासदारांची बैठक होणार आहे. कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेऊन लगेचच नवे उपाय आखले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचवेळी लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणण्याबाबत राजकीय नेते, आमदार, खासदार राजी नसल्याने गेल्या काही दिवसांपासून दिलेल्या सवलती मागेही घेतल्या जाऊ शकतात का, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे

पुणे : पुण्यात कोरोनाला रोखण्याकरिता कठोर उपाय आखूनही कोरोनाचा संसर्ग थांबत नसल्याची बाब राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार गांभीर्याने घेतली आहे. 'आपण कोरोनाला का रोखू शकत नाहीत, कोण कुठे कमी पडते आहे?' अशी विचारणा करीत, अजितदादांनी पुण्यातील आमदार-खासदारांना चर्चेला बोलाविले आहे. पुण्यातील कोरोना रुग्णांच्या वाढीचा वेग पाहता अजितदादा पुणेकरांसाठी कठोर निर्बंध लादणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अजितदादांच्या समवेत दुपारी चार वाजता आमदार आणि सर्व खासदारांची बैठक होणार आहे. कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेऊन लगेचच नवे उपाय आखले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचवेळी लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणण्याबाबत राजकीय नेते, आमदार, खासदार राजी नसल्याने गेल्या काही दिवसांपासून दिलेल्या सवलती मागेही घेतल्या जाऊ शकतात का, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

त्यातच कोरोनाचे खापर राज्य सरकार फोडत भाजप सरकारविरोधात आंदोलन केले आहे. त्यामुळेही अजितदादा पुणेकरांबात फारच गंभीर झाले आहेत. त्यामुळे लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यांत पालकमंत्री काय भूमिका घेणार हेही महत्त्वाचे आहे. याआधीही पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात लॉकडाऊनची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर काही पुण्यात सर्व व्यवहार बंद करण्यात आले होते.

आमदार चेतन तुपे म्हणाले, "पुण्यात कोरोनाला थोपविण्यासाठी काय करावे हेही स्थानिक राज्यकत्यांना कळू नये. ते कळत नाही म्हणून महापालिकेतील सत्ताधारी उपाययोजना करण्यापेक्षा आंदोलने करीत आहे. आंदोलनाची ही वेळ आहे.? इतकेही भान या मंडळीना नसावे. मात्र, पालकमंत्री योग्य निर्णय घेतील." 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख