...अजित पवार खंबीरपणे उभे राहिले मोठ्या भावासारखे! - Ajit Pawar Helped Party's Old Leaders family | Politics Marathi News - Sarkarnama

...अजित पवार खंबीरपणे उभे राहिले मोठ्या भावासारखे!

मिलिंद संगई
मंगळवार, 29 सप्टेंबर 2020

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते गुरुनाथ कुलकर्णी यांचे पक्षाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान होते. त्यांचे दुर्देवाने निधन झाल्यानंतर या कुटुंबियांशी पवार यांचा संपर्क कमी झाला होता. मात्र त्यांच्या पत्नी स्वप्नगंधा एका रुग्णालयात उपचार घेत असून त्यांना उपचारासाठी मदतीची गरज आहे, असे अजित पवार यांना कुणीतरी सांगितले. कुलकर्णी यांची मुलगी अमेरिकेत असते व स्वप्नगंधा यांना वैद्यकीय उपचारांसाठी मदतीची गरज होती, पवार यांना जेव्हा ही परिस्थिती समजली तेव्हा क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी तीन लाख रुपये देत स्वतः डॉक्टरांशी बोलून त्यांच्यावर योग्य ते उपचार करण्याच्या सूचना दिल्या. 

बारामती : नेता कसा असावा, कार्यकर्त्यांचे मन जाणणारा आणि सुख दुःखात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे मोठ्या भावाप्रमाणे उभा राहणारा. राष्ट्रवादीत उपमुख्यमंत्री अजित पवार ही भूमिका अनेकदा घेताना दिसतात. आपल्या कडक स्वभावासाठी प्रसिध्द असणारे अजितदादा जेव्हा एखाद्या कार्यकर्त्यावर वेळ येते तेव्हा तितकेच मृदू होतात आणि त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते गुरुनाथ कुलकर्णी यांचे पक्षाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान होते. त्यांचे दुर्देवाने निधन झाल्यानंतर या कुटुंबियांशी पवार यांचा संपर्क कमी झाला होता. मात्र त्यांच्या पत्नी स्वप्नगंधा एका रुग्णालयात उपचार घेत असून त्यांना उपचारासाठी मदतीची गरज आहे, असे अजित पवार यांना त्यांचे स्वीय सहाय्यक सुनिल मुसळे यांनी सांगितले. 

कुलकर्णी यांची मुलगी अमेरिकेत असते व स्वप्नगंधा यांना वैद्यकीय उपचारांसाठी मदतीची गरज होती, पवार यांना जेव्हा ही परिस्थिती समजली तेव्हा क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी तीन लाख रुपये देत स्वतः डॉक्टरांशी बोलून त्यांच्यावर योग्य ते उपचार करण्याच्या सूचना दिल्या. 

ज्या कार्यकर्त्याने पक्षबांधणीत मोलाचे योगदान दिले, अडचणीच्या काळात जिवाला जीव दिला त्या कार्यकर्त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबियांकडे इतक्या आपुलकीने लक्ष दिल्याने अनेक कार्यकर्त्यांना याचे अप्रुप वाटले. 

विशेष म्हणजे कोठेही गाजावाजा न करता अतिशय आपुलकीने चौकशी करुन अजित पवार यांनी कुलकर्णी यांच्या कुटुंबिय़ाच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे आहोत हे त्यांना दाखवून दिले. कार्यकर्त्यांच्या अडचणीच्या काळात त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा हा अजित पवार यांचा काही पहिला प्रसंग नव्हता, मात्र आपणहून पुढाकार घेऊन त्यांनी कुलकर्णी यांच्या कुटुंबियांना ही मदत देऊ केली ही बाब यात वेगळेपणाची ठरली. स्वप्नगंधा या लवकर ब-या व्हाव्यात या दृष्टीने सर्व प्रयत्न करा, अशा सूचना संबंधित डॉक्टरांना देण्यासही अजित पवार विसरले नाहीत. 

Edited By - Amit Golwalkar
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख