चेतन तुपे यांच्या राजीनाम्यानंतर शहराध्यक्षपदी या नेत्यांची लागू शकते वर्णी 

त्याला तोडीस तोड आव्हान देण्याची जबाबदारी नव्या शहराध्यक्षांवर असेल.
After the resignation of Chetan Tupe, this leaders names are discussed for the post of Pune city president
After the resignation of Chetan Tupe, this leaders names are discussed for the post of Pune city president

पुणे  ः पुणे महानगरपालिकेच्या आगामी २०२२ मधील निवडणुकीत सत्ता काबिज करायचीच, हे ध्येय राष्ट्रवादी कॉंग्रेसने ठेवले आहे. त्या दृष्टीने पक्षाने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यातून एक व्यक्ती, एक पद या धोरणानुसार आमदार चेतन तुपे यांनी शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. तुपे यांच्या जागी नवा चेहरा आणि नवी कार्यकारिणी आणून संघटनेत पुन्हा एकदा चैतन्य निर्माण करण्याचे पक्षाचे धोरण आहे. त्यानुसार नव्या अध्यक्षांची निवड १ मे रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. शहराध्यक्षपदासाठी आता माजी महापौर दत्तात्रेय धनकवडे, प्रशांत जगताप, माजी सभागृह नेते सुभाष जगताप, माजी उपमहापौर दीपक मानकर यांची नावे चर्चेत आहेत. तर, आमदार सुनील टिंगरे यांच्या नावाचाही विचार होऊ शकतो, असे पक्षांतर्गत सूत्रांकडून सांगण्यात आले. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे पुणे महापालिकेची सत्ता २००७ मध्ये आली. तत्पूर्वी पुण्याची सत्ता कॉंग्रेसकडे होती. त्यानंतर सलग दोन निवडणुकांत राष्ट्रवादी कॉंग्रेसने सर्वाधिक नगरसेवक निवडणून आणत महापालिकेतील सत्ता राखली होती. मात्र, २०१७ च्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेमुळे शहरात पहिल्यांदाच भाजपचे तब्बल ९८ नगरसेवक निवडून आले आहेत. या लाटेतही पक्षाचे सुमारे ४२ नगरसेवक राष्ट्रवादी कॉंग्रेसने निवडून आणले होते. कॉंग्रेस, शिवसेना आणि मनसेच्या नगरसेवकांची संख्या सिंगल डिजिटवर आहे. 

महापालिकेची निवडणूक आता ८ महिन्यांवर आली आहे. यंदा काहीही झाले तरी, सत्ता पुन्हा काबिज करायची, असा निर्धार राष्ट्रवादी कॉंग्रेसने केला आहे. पक्षाचे नेते अजित पवार यांनी जाहीर कार्यक्रमांतही त्या बाबत सातत्याने सूतोवाच केले आहे. तसेच शहराध्यक्ष बदलणार असल्याचेही त्यांनी या पूर्वी तीन वेळा जाहीर केले होते. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्या बाबत सूतोवाच केले होते.

तसेच तुपे यांना या पूर्वी महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपद, शहर सुधारणा समितीचे अध्यक्षपद, आमदारकी आणि शहराध्यक्षपद मिळाले आहे. त्यामुळे आता नव्या चेहऱ्याला या पदावर संधी मिळावी, अशी मागणी शहरातील काही ज्येष्ठ्य कार्यकर्त्यांनी अजित पवार, प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्याकडे केली होती. 

या पार्श्वभूमीवर तुपे यांनी पक्षनेत्यांबरोबर झालेल्या चर्चेनंतर तुपे यांनी शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा पत्रात तुपे यांनी म्हटले आहे की, हडपसर विधानसभा मतदारसंघात सुमारे पाच लोकसंख्या आहे. या मतदारसंघाचा विस्तार मोठा आहे. त्यात अनेक विकास कामे सुरू झाली आहेत. मतदारांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मतदारसंघाला पुरेसा वेळ द्यायचा आहे. त्यासाठी शहराध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे. तत्पूर्वी कोरोनाची लागण झाल्यामुळे तुपे हे सुमारे दीड महिना वैद्यकीय उपचार घेत होते. 

महापालिका निवडणुकीसाठीच्या तयारीचा एक भाग म्हणून पक्षाने शहराध्यक्ष बदलण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या अध्यक्षांची निवड एक मे रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर नवे अध्यक्ष शहराची कार्यकारिणी जाहीर करेल. त्यात विविध घटकांना सामावून घेण्यात येईल. तसेच महापालिका निवडणुकीसाठी भाजपने सध्या जोरदार तयारी सुरू केली आहे. त्याला तोडीस तोड आव्हान देण्याची जबाबदारी नव्या शहराध्यक्षांवर असेल. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com