हरी नरके यांच्या लेखावरून वादंग; अखेर व्यक्त केली दिलगिरी

दहाव्या मुद्द्यात मी व्यसनाधिनता, घरेलू महिला कामगारांच्या हिंसाचाराचे दु:ख आणि इतर मुद्दे उपस्थित केले होते. मी ते सर्व मुद्दे मागे घेत असूनमाझ्या सर्व प्रिय बौद्ध बांधवांची दिलगिरी व्यक्त करीत आहे
 after buddhist criticism professor hari narake apologized
after buddhist criticism professor hari narake apologized

पुणे: पुरोगामी विचारवंत प्रा. हरी नरके यांनी लिहलेल्या एका लेखात व्यसनाधिनता व महिला हिंसाचारासंदर्भात मांडलेल्या मुद्यांवर बौद्ध समाजातील काही लोकांनी आक्षेप घेतला होता. त्यावरून सोशल मिडीयावर टीकाटिप्पण्णी सुरू होती. अखेर याप्रकणात दिलगिरी व्यक्त करून हरी नरके यांनी वादावर पडदा टाकला आहे.

हरी नरके यांनी २६ जुन २०२० रोजी शाहू जयंतीनिमित्त लेख लिहला होता. छ. शाहूराजांचा रिलेव्हन्स काय? असे त्या लेखाचे शिर्षक होते. 'फुले-शाहू-आंबेडकर यांच्यात ४२ गोष्टींबाबत साम्य होते.त्यातली एक म्हणजे हे तिघेही निर्व्यसनी होते. संपुर्ण निर्व्यसनी' असा उल्लेख करून नरके यांनी दहाव्या मुद्यात व्यसनाधिनता आणि घरेलू हिंसाचारासंदर्भात काही मांडणी केली होती. त्या मांडणीला बौद्ध समाजातून आक्षेप घेण्यात आला होता. नरके यांच्यावर टीका
टिप्पण्णी करण्यात येत होती. अनेकांनी नरके यांची मांडणी बरोबर असल्याचेही म्हटले होते. सोशल मिडीयावर हा वाद गाजत होता. त्यावर दिलगिरी व्यक्त करून नरके यांनी वादावर पडदा टाकला आहे.

यासंदर्भाने नरके यांनी आपल्या फेसबुकपोस्टमध्ये म्हटले आहे की, ''गेल्या ४० वर्षात आंबेडकरी बौद्ध चळवळीतील भावांनी व बहिनींनी मला अमाप प्रेम, आपुलकी, मानसन्मान दिला. त्यांनीच मला मोठे केले. या प्रबोधनाच्या चळवळीतून मला खूप काही शिकता आले. मी नामांतर आंदोलनात तुरूंगवास भोगला होता याला आता ३८ वर्षे झाली. मी या माझ्या भावंडांचा तसेच वडीलधार्‍यांचा कृतज्ञ आहे. माझ्या २६ जुन २०२० च्या राजर्षी शाहू छत्रपती महाराजांवरील लेखातील दहाव्या मुद्द्यात मी व्यसनाधिनता, घरेलू महिला कामगारांच्या हिंसाचाराचे दु:ख आणि इतर मुद्दे उपस्थित केले होते. मी ते सर्व मुद्दे मागे घेत असून माझ्या सर्व प्रिय बौद्ध बांधवांची दिलगिरी व्यक्त करीत आहे.'

सोलापुरात 93 वर्षांच्या आजी झाल्या कोरोनामुक्त

सोलापूर : सोलापुरातील मुळेगाव (साईनगर) येथील 93 वर्षांच्या आजी जबरदस्त इच्छाशक्ती, वेळेत तपासणी, योग्य निदान आणि त्वरित उपचार मिळाल्याने कोरोनामुक्त झाल्या आहेत. घरात कमावतं कोणी नाही, एक मुलगा त्याचेही वय 63 च्या वर....दुसरी मुलगी कर्णबधीर... अशा परिस्थितीत 93 वर्षांच्या आजींचा भाऊ सारीच्या आजाराने मयत झाला. आजीचा संपर्क भावाशी आला होता, यातूनच आजीला कोरोनाची बाधा झाली होती.संघर्ष करण्याची सवय, रोगप्रतिकारशक्ती आणि जगण्याची इच्छाशक्ती यामुळे आजी घाबरल्या नाहीत. त्यांनी दाखविलेले धैर्य सर्वांना अनुकरणीय आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com