अब्दुल सत्तारांच्या कार्यक्रमातील माईक बंद करायला सांगणारा तो फोन कोणी केला?

ते आल्यानंतर ग्रामसचिवालयाचे उदघाटन करू; तोपर्यत सभा सुरू करू, असे ठरविण्यात आले.
Who phoe called to turn off the mic In the program of Abdul Sattar
Who phoe called to turn off the mic In the program of Abdul Sattar

आळेफाटा (जि. पुणे) : महाविकास आघाडीत एकत्र नांदणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन पक्षांतील कुरघोडीचे राजकारण पुणे जिल्ह्यात काही केल्या थांबायचे नाव घेत नाही. जुन्नर तालुक्यात एका ग्रामसचिवालयाच्या उद्‌घाटनासाठी शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार आले हेाते. त्या कार्यक्रमात माजी सभापती बोलत असताना माईक दोन ते तीन वेळा बंद पडला. त्याचे कारण विचारले असता, ‘मला माईक बंद करा, असा फोन आला होता,’ असे स्पीकर ऑपरेटने सांगितले. त्यावर चिडलेल्या सत्तार यांनी ‘माझ्यामुळे तुमची अडचण होत असेल, तर मी जातो,’ असे सांगून कार्यक्रम अर्ध्यावर सोडून निघून गेले. त्यांच्यासोबत माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व इतर नेतेही निघून गेले. पण, माईक बंद करा, असा सांगणारा तो फोन केला होता, याची चर्चा जुन्नर तालुक्यात सुरू आहे. (Who phoe called to turn off the mic In the program of Abdul Sattar)

पारगावतर्फे आळे (ता. जुन्नर) येथे ‘ग्राम संसद' या ग्रामसचिवालयाच्या नूतन इमारतीचा उदघाटन समारंभ हा सर्वपक्षीय समारंभ आयोजित केला हेाता. पण, तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अतुल बेनके हे जुन्नर येथील प्रशासकीय बैठकीत उपस्थित होते. ते आल्यानंतर ग्रामसचिवालयाचे उदघाटन करू; तोपर्यत सभा सुरू करू, असे ठरविण्यात आले.  दरम्यानच्या काळात राज्यमंत्री सत्तार यांनी शिवसेना शाखा कार्यालयाचे उदघाटन केले

माजी सभापती शिवाजी चव्हाण ह्यांनी प्रास्तविक भाषणाला सुरूवात केली. त्यांच्या भाषणादरम्यान दोन तीन वेळा माईक बंद पडला. माईक बंद करा, असे कोणीतरी सांगितले असल्याने माईक बंद झाल्याची चर्चा सुरु झाली. त्याच वेळी व्यासपीठावरील काही मान्यवरांनी स्पीकर ऑपरेटला विचारले, ‘माईक का बंद करता, तेव्हा त्याने सांगितले की, मला फोन आला होता, माईक बंद कर म्हणून त्यानंतर मी माईक बंद केला, असे त्याने सांगितले. त्यामुळे चिडलेले राज्यमंत्री सत्तार हे ‘माझ्यामुळे तुम्हाला अडचण होत असेल, तर मी जातो,’ असे म्हणून ते व्यासपीठावरुन उठले आणि तडक कार्यक्रम सोडून निघून गेले. त्यांच्यासोबत शिवसेनेचे उपनेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासह शिवसेनेचे सर्व नेते आणि कार्यकर्ते यांनी कार्यक्रमाचे ठिकाण सोडले. 

शिवसैनिकांनीच सत्तारांचा अपमान : बेनके

आमदार बेनके आल्यानंतर त्यांच्या हस्ते ग्रामसचिवालयाचे उदघाटन करण्यात आले. उशीरा आलेल्या आमदार बेनके यांनी विलंबाबद्दल दिलगिरी व्यक्त करून राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याविषयी गौरवोद्गार काढले. राज्यमंत्री सत्तार, माजी खासदार, माजी आमदार व त्यांच्या नेतेमंडळींची यात चूक नाही. त्यांचा अवमान गावाने केलेला नाही, तर त्यांचा अवमान त्यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे, असा आरोपही बेनके यांनी केला. 

हा जुन्नर तालुक्यातील जनतेचा अपमान : सोनवणे

या प्रकाराबाबत शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार शरद सोनवणे म्हणाले की, पारगावतर्फे आळे या गावात जो काय प्रकार घडला, तो चांगला नाही. मंत्र्यांच्या कार्यक्रमात माईक बंद करणे, हा त्यांचा अपमान नसून हा अपमान जुन्नर तालुक्यातील जनतेचा आहे. सभा सुरू झाल्यानंतर पहिल्या भाषणाच्या वेळीच दोन ते तीन वेळा माईक बंद करण्यात आला. यामुळे व्यासपीठावरील काही मान्यवरांनी स्पीकर ऑपरेटला विचारले, ‘माईक का बंद करता, तेव्हा त्याने सांगितले की, मला फोन आला होता माईक बंद कर म्हणून; त्यानंतर मी माईक बंद केला, असे सांगितले.  त्यामुळे मंत्री सत्तार हे निघून गेले, असे सोनवणे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com