'मिनी मंत्रालया'साठीच्या मतदानाला सुरुवात

राज्यातील १४,२३४ ग्रामपंचायतींसाठी ही निवडणूक आहे. या निवडणुका बिनविरोध करण्याचे आवाहन राज्यातील नेत्यांनी केले होते. त्यासाठी लाखोंची बक्षीसे जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे अनेक निवडणुका बिनविरोध झाल्या. काही ठिकाणी सरपंचपदासाठीचे लिलावही झाले. अशा ठिकाणच्या निवडणुकांना स्थगिती देण्यात येणार आहे. या निवडणुकांनंतर सरपंचपदासाठीचे आरक्षण काढण्यात येणार आहे.
Voting for Gramnchayat Elections Started
Voting for Gramnchayat Elections Started

पुणे : आज सकाळपासून 'मिनी मंत्रालय'म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांसाठीचे मतदान सुरु झाले आहे. कोरोनाची साथ आटोक्यात आल्यानंतर या निवडणुका होत आहे. विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या पाच जागांसाठी सुरळीतपणे निवडणुका पार पडल्यानंतर आता या निवडणुका होत आहेत.

राज्यातील १४,२३४ ग्रामपंचायतींसाठी ही निवडणूक आहे. या  निवडणुका बिनविरोध करण्याचे आवाहन राज्यातील नेत्यांनी केले होते. त्यासाठी लाखोंची बक्षीसे जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे अनेक निवडणुका बिनविरोध झाल्या. काही ठिकाणी सरपंचपदासाठीचे लिलावही झाले. अशा ठिकाणच्या निवडणुकांना स्थगिती देण्यात येणार आहे. या निवडणुकांनंतर सरपंचपदासाठीचे आरक्षण काढण्यात येणार आहे. 

सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सत्तर ग्रामपंचायतींपैकी चार ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत त्यामुळे ६६ ग्रामपंचायतीमध्ये ४९४ जागांसाठी प्रत्यक्ष मतदान आज पासून पार पडत आहे सत्तर ग्रामपंचायतीमधील ६०० जागांपैकी १०६ सदस्यांना जागा बिनविरोध झाल्या आहेत  प्रत्यक्ष उमेदवार १०८७ रिगणात आहेत प्रत्येक मतदार केंद्रात सोशल डीस्टन पाळून आणि सॅनिटाईज करून मतदान केलं जातंय तसेच पोलीस प्रशासन किंवा आरोग्य पथक देखील सज्ज आहे.

पंढरपूर

पंढरपूर तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतींसाठी  आज सकाळ पासून  मतदान सुरू झाले.
मतदान केंद्रावर सॅनिटायझर,मास्क आणि सोशल डिस्टन्सींग चे सर्व नियम पाळून मतदान प्रक्रिया सुरू आहे.यामध्ये सहा अतिसंवेधनशील तर १३ गावे संवेदनशील गावे आहेत.येथे  विशेष पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.  ग्रामपंचायतीासठी १ हजार ६५७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तालुक्यात  १ लाख ९६ हजार मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार  आहेत.  मतदान प्रक्रिया शांतेत व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आल आहे.

यवतमाळ 

राज्यभरातील ग्रामपंचायतीचे मतदान आज पार पडत आहे . यवतमाळ जिल्ह्यात राज्यातील दुसऱ्या क्रमांकांच्या ग्रामपंचायत निवडणुकीची विशाल प्रक्रिया आज पार पडत आहे . आज जिल्ह्यात  ९२५ ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडत आहे .या साठी प्रशासन सज्ज आहे . जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या ८१०१ जागांसाठी १७ हजार ११७ उमेदवार रिंगणात उभे आहे . यामध्ये ८ हजार ८०१ महिला उमेदवार महिला उमेदवार आहेत . या उमेदवारांना निवडून देण्यासाठी १२ लाख ३० हजार १६२ मतदार निवडणूक प्रक्रियेत भाग घेत आहे . प्रत्यक्षात मतदार राजा कोणाला मतदान करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे . मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडावी यासाठी पोलिसांचा मोठा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे .  कोणाचा विजय होतो आणि कोणाचा पराभव याचा कौल येत्या १८ तारखेलाच कळेल.

भिवंडी

भिवंडीतील ५३ ग्रामपंचायतीसाठी मतदान प्रक्रियेला प्रत्यक्ष सुरुवात झालीय. सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाली असून मतदाराने उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळतंय. एकूण ५६ ग्रामपंचायत साठी निवडणूक प्रक्रिया पार पडत असून त्यातील तीन ग्रामपंचायत बिनविरोध निवडून आल्या आहेत. सध्या ५३ ग्रामपंचायतींसाठी मतदान करण्यात येतंय.

रायगड

रायगड जिल्ह्यात मतदान प्रक्रियेला सुरवात झाली असून महाड तालुक्यातील बिरवाडी ग्रामपंचायतिच्या मतदान केंद्रावर मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली मतदार मतदान केंद्रावर रांगेत आपला हक्क बाजावण्या साठी उभे असून येणाऱ्या मतदारांची रायगड जिल्हा आरोग्य विभागाकडून तपासणी करून आत सोडलं जात आहे तर ग्रामपंचायत निवडणुकीत एकूण १ हजार ५८८ उमेदवार रिंगणात उतरले आहेत तर प्रत्येक मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्त ही ठेवण्यात आला आहे.

नंदुरबार

जिल्ह्यात एकूण ८७ ग्रामपंचायतीसाठी सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाली होती. त्यापैकी २२ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. तर एका ग्रामपंचायतीची निवडणूक रद्द झाल्याने उर्वरित ६४ ग्रामपंचायतींसाठी सकाळपासूनच शांततेत मतदानाला सुरुवात झाली आहे.

अमरावती 

अमरावती जिल्ह्यात ५३७ ग्रामपंचायतीसाठी आज होणाऱ्या निवडणुकीत १० लाख ४० हजार १५९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यंदा निवडणुकीत सर्वच मोठ्या पक्षांनी त्यांचे उमेदवार मैदानात उतरवल्यामुळे मतदारांचा नेमका कौल कोणाला िमळणार याबाबतही उत्सुकता आहे. ५५३ पैकी १३ ग्रामपंचायती या बिनविरोध झाल्या व तीन ग्रामपंचायतीत एकूण जागांपैकी काही जागांसाठी वैध नामनिर्देशन पत्र प्राप्त न झाल्याने, तसेच तेथील उर्वरित जागा बिनविरोध झाल्याने निवडणूक होणार नाही. उर्वरित ५३७ ग्रामपंचायतीच्या ४ हजार ३९७ सदस्य िनवडणुकीच्या रिंगणात आहेत. 
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com