उरुळीत राष्ट्रवादीचे बडेकर, भाजपचे जगताप, कांचन यांना झटका; ग्रामपंचायतीची सत्ता तरुणांकडे

मातब्बर नेत्यांना मतदारांनी पराभवाचा झटका दिला.
In Uruli Kanchan, NCP and BJP leaders rejected; The power of Gram Panchayat is in the hands of the youth
In Uruli Kanchan, NCP and BJP leaders rejected; The power of Gram Panchayat is in the hands of the youth

उरुळी कांचन (जि. पुणे) : पुणे जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका पक्ष, पॅनेल, आघाडीनिहाय लढल्या जात असताना, उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत निवडणुकीत मात्र वेगळाच प्रयोग पहायला मिळाला. येथील तरुणाईने बुजुर्गांचे नेतृत्व झुगारून एकसंघ पॅनेलद्वारे न लढवता प्रत्येक प्रभागात सोयीस्कर युती अथवा आघाडी करून निवडणूक लढवण्याचा अभिनव प्रकार केला होता. यात मतदारांनी अनेक मातब्बरांना पराभवाचा झटका देत ग्रामपंचायतीत युवकांना संधी दिली आहे. 

ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या पंचायत समितीच्या माजी उपसभापती हेमलता बाळासाहेब बडेकर, त्यांचे सुपुत्र उरुळी कांचनचे माजी उपसरपंच तथा राष्ट्रवादी कॉंग्रेस सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र बडेकर, माजी उपसरपंच युवराज कांचन, भाजपचे पश्‍चिम महाराष्ट्र व्यापारी आघाडीचे अध्यक्ष विकास जगताप, हवेली तालुका भाजपचे अध्यक्ष सुनील कांचन पाटील यांच्या भावजय प्रियांका अनिल कांचन, माजी उपसरपंच सुनील दत्तात्रेय कांचन यांच्या पत्नी चारुशीला कांचन, हवेली तालुका शिवसेना महिला आघाडी प्रमुख सविता कांचन अशा मातब्बर नेत्यांना मतदारांनी पराभवाचा झटका दिला. 

दुसरीकडे, जिल्हा परिषद सदस्या किर्ती कांचन यांचे पती अमित बाबा कांचन, माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव कांचन यांच्या सूनबाई ऋतुजा कांचन, माजी सरपंच दत्तात्रेय कांचन यांच्या पत्नी सीमा कांचन, अश्विनी कांचन यांचे पती राजेंद्र कांचन, माजी उपसरपंच भाऊसाहेब तुपे यांच्या पत्नी अनिता तुपे, माजी उपसरपंच भाऊसाहेब कांचन या प्रमुख उमेदवारांना मात्र मतदारांनी पसंती दर्शविली आहे. 

उरुळी कांचन ग्रामपंचायतीच्या सतरापैकी एक जागा बिनविरोध झाली होती. ग्रामपंचायतीसाठी बहुसंख्य तरुण उमेदवारांनी बुजुर्गांचे नेतृत्व झुगारून कोणत्याही एकसंघ पॅनेलद्वारे निवडणूक न लढवता प्रत्येक प्रभागात सोयीस्कर अशी युती अथवा आघाडी करून प्रसंगी मागील निवडणुकीचे प्रतिस्पर्धी एकत्र येऊन निवडणूक लढवण्याचा वेगळा प्रयोग या ठिकाणी घडला होता. युवकांना आपापल्या गावात स्वतःचे नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी या निवडणुका महत्त्वाच्या ठरतात, त्यामुळे लोकांच्या नजरा निकालांकडे उत्सुकतेने लागल्या होत्या. 

आगामी काळात उरुळी कांचनला सक्षम नेतृत्व कोण देणार व कोणाच्या अधिपत्याखाली उरुळी कांचन गावाचा विकास होणार? हे निरुत्तरीतच राहिले आहे. 

प्रभागनिहाय विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे ः प्रभाग एक- अमित भाऊसाहेब कांचन, स्वप्निशा आदित्य कांचन व मिलिंद तुळशीराम जगताप. प्रभाग 2 - राजेंद्र बबन कांचन, अनिता सुभाष बगाडे व ऋतुजा अजिंक्‍य कांचन. प्रभाग 3- सुनील आबुराव तांबे व सायली जितेंद्र बडेकर. प्रभाग 4- संतोष हरिभाऊ कांचन व मयूर पोपट कांचन तर सीमा दत्तात्रय कांचन (बिनविरोध). प्रभाग 5- संचिता संतोष कांचन, अनिता भाऊसाहेब तुपे व शंकर उत्तम बडेकर. प्रभाग 6- भाऊसाहेब लक्ष्मण कांचन, प्रियंका ओंकार कांचन (पाटेकर) व सुजाता चंद्रकांत खलसे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com