दोन छत्रपती एकत्र आले आणि म्हणाले,``लोकशाहीतल्या राजांना जाब विचारा`` - two Chatrapatis come together for Maratha Reservation in Pune | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुण्यातील हॉटेल सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहणार : अजित पवारांच्या बैठकीत निर्णय

दोन छत्रपती एकत्र आले आणि म्हणाले,``लोकशाहीतल्या राजांना जाब विचारा``

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 14 जून 2021

दोन छत्रपती बऱ्याच वर्षांनी एकत्र

पुणे : ``दोन्ही छत्रपती घराण्याचा मोठा वारसा आहे. दिशाभूल करणे आमच्या रक्तात नाही. मी  छत्रपती उदयनराजे यांची भेट घेतली. सगळ्या विषयांवर आमचे एकमत आहे. काही दुमत नाही. एकमताने आम्ही काम केले आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी (Maratha Reservation) आम्ही एकत्र काम करू,`` अशी ग्वाही खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिली. (two Chatrapatis come together for Maratha Reservation in Pune)

त्यांनी आज उदयनराजे (Udayan Raje) यांची भेट घेतली. या भेटीची राज्याच्या राजकारणात उत्सुकता होता. दोन्ही खासदारांनी मराठा समाजाला आरक्षण मिळणे गरजेचे असल्याचे एकत्रित घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.    

संभाजीराजे (SambhajiRaje) म्हणाले, आरक्षण मिळवण्यासाठी आपल्याकडे दोन पर्याय आहेत. त्यामध्ये पुनर्विचार याचिका दाखल करणे आणि दुरुस्ती याचिका करणे, असे हे दोन पर्याय आहेत  मात्र, भोसले समितीने सांगितल्यानुसार आपल्याला दुरुस्ती याचीका दाखल करण्याची गरज नाही. आपल्याला मागासवर्गीय आयोग स्थापन करुन राज्यापालांकडे जावे लागणार आहे. त्यानंतर राज्यापाल तो अहवाल राष्ट्रपतींकडे सादर करतील आणि नंतर तो अहवाल केंद्रीय मागासवर्गीय आयोगाकडे जाईल.  

हे ही वाचा : जळगावमध्ये संजय राऊतांच्या विधानाची ठिणगी!

सारथी संस्थेला निधी द्या, अण्णासाहेब पाटील महामंडळ, ओबीसींच्या सवलती मराठा विद्यार्थ्यांना द्या, प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह आणि विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवा, अशा मागण्या यावेळी संभाजीराजे यांनी केल्या. आमच्या मागण्या मागण्या मान्य करा. आम्ही तुमचे स्वागत करु, असेही ते म्हणाले. सातारा, कोल्हापूर दोन्ही घराणे एकत्र आले. या भेटीमुळे मला मनापासून आनंद झाला, असेही संभाजीराजे यांनी सांगितले.

आम्ही दोघे एकाच घराण्यातले आहोत. दोन घराण्यांचा विचारसुद्धा एकच आहे. संभाजीराजे यांच्या विचाराशी मी सहमत असल्याचे उदयनराजे म्हणाले. या देशाची पुन्हा फाळणी कराचयी की नाही, याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. या देशाचे राज्यकर्ते फाळणी करण्यासाठी काम करत आहेत. असे माझे ठाम मत आहे, असे ते म्हणाले.

कोणत्याच समाजे आरक्षण रद्द करु नका. आम्ही जात कधीच बघीतली नाही. आज जात जाणवत आहे. जे लहानपणीचे मित्र आहेत, ते आज अंतर ठेऊन बोलतात. ही दुफळी निर्माण करण्याचे काम राज्यकर्ते करत आहेत. त्याच्याशी समाजाचा काहीच संबंध नाही.  व्यक्तिगत स्वार्थासाठी आम्ही कधीच दुफळी निर्माण होईल असे काम केले नाही. समाजाचा मोठ्या प्रमाणात उद्रेक झाला तर त्यासाठी राजकारणी जबाबदार असणार आहेत. आम्ही जरी समाजाला थांबले तरी ते थांबणार नाहीत. आमच्यावर सुद्धा हल्ला होईल. ही वेळ कोणामुळे येणार आहे? आपण भूतकाळातील विचार केला पाहिजे.  तुम्ही चांगले राजकारण करा. निवडूण येण्यासाठी कारण नसताना समाजात दरी निर्माण केली जाते, असेही उदयनराजे यांनी सांगितले.

हे ही वाचा : बीड जिल्ह्यात येणारा विकास निधी गावांपर्यंत जात नाही; क्षीरसागरांची ठाकरेंकडे तक्रार...

आंदोलनाला माझा पाठिंबा आहे. राज्यकर्त्यांना फार मुभा दिली आहे. लोकशाहीतल्या राज्यांना जाब विचारला पाहिजे. लोकशाहीच्या राज्याना गाडा, त्यांना विचारा, मला विचारा, प्रत्येक आमदार खासदारांच्या घरी जाऊन आंदोलन करा, एकदा होऊन जाउदे, अशा शब्दात त्यांनी नेत्यांना इशारा दिला.(two Chatrapatis come together for Maratha Reservation in Pune)

ज्यावेळी राज्यघटना लिहिली गेली, त्यावेळची परिस्थिती आणी आताची परिस्थिती वेगळी आहे. भारतात जातीपाती आहेत. या लोकांना एकत्र ठेवले नाही तर देशाचे तुकडे होतील. कोणत्याही समाजाचा आमदार, खासदार असो त्यांना जाब विचारला पाहिजे. मराठ्यांना आरक्षणाची शिफारस करणारा गायकवाड अहवाल कोणीच वाचला नाही, असेही त्यांनी सांगितले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संभाजीराजे यांना भेट दिली नाही. तुम्ही दोघे मोदींना भेटणार का असे विचारले असता संभाजीराजे म्हणाले मी जेव्हा त्यांना भेट मागितली आहे तेव्हा त्यांनी आधी भेट दिली होती. मात्र, आता कोरोनामुळे भेट दिली नसेल, अशी सारवासारव केली. 

Edited By - Amol Jaybhaye  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख