MPSC चा नाद सोडा; आत्महत्या केलेल्या स्वप्नीलने मांडली व्यथा - Swapnil Lonakar presents the grief of students appearing for MPSC exams | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, शहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची पहिलीच भेट

MPSC चा नाद सोडा; आत्महत्या केलेल्या स्वप्नीलने मांडली व्यथा

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 3 जुलै 2021

मी घाबरलो, खचलो मुळीच नाही.

पुणे : राज्य लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा देऊनही नोकरी मिळत नाही, त्यामुळे यात पडू नका. जमलं तर हे इतरांपर्यंत पोचवा, अनेक जीव वाचतील, असा उल्लेख करीत स्वप्नील लोणकर याने लाखो तरुणांची मनोवस्था आत्महत्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीतून मांडली आहे. (Swapnil Lonakar presents the grief of students appearing for MPSC exams)

स्वप्नील लोणकर हा एमपीएससीची 2019 ची पूर्व आणि मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाला होता. मात्र, गेल्या दीड वर्षापासून त्याची मुलाखत झाली नव्हती. त्यामुळे तो तणावात होता.  त्याने 2020 मध्येही एमपीएससीची परिक्षा दिली होती. ती पूर्व परीक्षाही तो उत्तीर्ण झाला होता. मात्र, कोरोनामुळे मुख्य परीक्षा झाली नव्हती. एमपीएसीसीची परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी नाही.

घरची आर्थिक परिस्थिती नाजूक असूनही कुटुंबीयांना आर्थिक हातभार लावू शकत नाही, या तणावातून स्वप्नील लोणकर याने आत्महत्या केली. त्यामुळे ‘एमपीएससी’च्या परीक्षा व नोकऱ्यांबाबतच्या राज्य सरकारच्या चालढकलीच्या भूमिकेवर आता प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे. 

हेही वाचा : MPSC उत्तीर्ण होऊनही नोकरी नाही; स्वप्नील लोणकरची आत्महत्या 

आत्महत्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत स्वप्नील लोणकर याने म्हटले आहे की, कोरोना नसता आणि सर्व परीक्षा सुरळीत झाल्या असल्या तर आज आयुष्य खूप वेगळं आणि चांगलं असते. हवे ते, ठरवले ते प्रत्येक साध्य झाले असते. मी घाबरलो, खचलो मुळीच नाही, फक्‍त मी कमी पडलो. माझ्याकडे वेळ नव्हता. अशा शब्दांत त्याने आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. 

 
शंभर जणांचे जीव वाचविण्याचे स्वप्न राहिले अपूर्ण

स्वप्नील लोणकर हा डेंगी, कर्करोग, विषाणूजन्य तापाच्या तसेच दुर्धर आजाराच्या रुग्णांसाठी नेहमीच प्लेटलेट दान करीत होता. त्याने एक-दोनदा नव्हे, तर तब्बल 28 वेळा रक्तपेढीमध्ये जाऊन प्लेटलेट दान केल्या होत्या. कोरोना महामारीतही त्याने रुग्ण, रुग्णालयांसह अनेकांना मित्रांच्या सहकार्याने मदतीचा हात दिला. तो सामाजिक कार्यातही सक्रीय होता. प्लेटलेट दान करून त्यास 100 जणांचे जीव वाचवायचे होते. पण, त्यापूर्वीच त्याने आत्महत्या केली. मृत्यूपुर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्याने हा उल्लेख आवर्जून केला आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख