जनतेच्या प्रश्‍नांवर पवारांनी सरकारला चिमटा काढावा : चंद्रकांत पाटील 

जनतेचे कुठलेही प्रश्न राज्य सरकारला सोडवता येत नाहीत.
Pawar should tweak government on people's issues: Chandrakant Patil
Pawar should tweak government on people's issues: Chandrakant Patil

राजगुरुनगर (जि. पुणे) : आंदोलने केल्याशिवाय जनतेच्या प्रश्नांवर सरकारकडून न्याय मिळत नाही, अशी अवस्था असताना, जाणते राजे काय झोपा काढताहेत का? त्यांना सरकारला चिमटा घेता येत नाही का? असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. 

दरम्यान, भरमसाट वीजबिलाच्या विरोधात भाजप सोमवारपासून (ता. 23 नोव्हेंबर) प्रखर आंदोलन करणार असल्याचा इशाराही पाटील यांनी दिला. मराठा आरक्षण या करंट्या सरकारला टिकविता आले नाही, अशी टीकाही त्यांनी केली. 

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित मेळाव्यासाठी चंद्रकांतदादा राजगुरुनगर येथे आले होते. त्या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते. या वेळी जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, माजी मंत्री बाळा भेगडे, धर्मेंद्र खांडरे, जालिंदर कामठे, अतुल देशमुख, जयसिंग एरंडे, राजन परदेशी, अमृता गुरव, संगीता जगताप, शिवाजी मांदळे, रामदास मेदनकर, चांगदेव शिवेकर, कैलास गाळव आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

पाटील म्हणाले, "भाजप हवेवर चालणारा पक्ष आहे, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणत असतील, तर राष्ट्रवादी हा झोपेत चालणारा पक्ष आहे, असे आम्ही म्हणतो. त्यांना फक्त सत्तेची स्वप्न पडत असतात. आता मिळालेली फुकटची सत्ता त्यांच्या डोक्‍यात गेली आहे; म्हणून ते उर्मटपणे बोलत आहेत.' 

"जनतेचे कुठलेही प्रश्न राज्य सरकारला सोडवता येत नाहीत. सर्व समस्यांची जबाबदारी आधीच्या भाजप सरकारवर किंवा केंद्र सरकारवर ढकलून मोकळे व्हायचे, अशी त्यांची भूमिका आहे. त्यांची अवस्था आता "नाचता येईना अंगण वाकडे' अशी झाली आहे. सरकारने वीज कंपन्यांना पैसे द्यावेत, असा प्रस्ताव ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी मांडला होता. मात्र, अर्थमंत्री अजित पवार यांनी त्यास नकार दिला. लोकांकडून वाढीव वीजबिल वसूल न करता सरकारने वीज कंपन्यांना निधी देऊन हा प्रश्न सोडवावा. एसटी महामंडळ वाचविण्यासाठी ज्या ज्याप्रमाणे निधी दिला, त्याप्रमाणे वीज कंपन्या वाचविण्यासाठीही निधी दिला पाहिजे,' असे पाटील म्हणाले. 

आमच्या कार्यकाळात विनाअनुदानित शाळांचा प्रश्न सोडवून त्या सर्व शिक्षकांना पगार सुरू केले. शिक्षकेतर भरतीचा विषय सोडवला. शाळांना पाच टक्के वेतनेतर अनुदान सुरू केले. मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावून दोन वर्ष भरती केली. एमपीएससी आणि यूपीएससी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती सुरू केली. विदेशात शिकण्यासाठी फेलोशिप सुरू केली. ब्रिटिश काळापासून चालत आलेले अनेक चुकीचे कायदे बदलले. सातबाराचा उतारा ऑनलाइन केला. अशी असंख्य कामे भाजप सरकारने केली, असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. या वेळी गणेश भेगडे आणि बाळा भेगडे यांचीही भाषणे झाली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com