नाना पटोले लहान व्यक्ती मी त्यांच्यावर बोलणार नाही ; शरद पवार    - Sharad Pawar said about Congress state president Nana Patole | Politics Marathi News - Sarkarnama

नाना पटोले लहान व्यक्ती मी त्यांच्यावर बोलणार नाही ; शरद पवार   

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 11 जुलै 2021

लोणावळ्यातील मेळाव्यात बोलताना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला होता.

पुणे :  महाविकास आघाडीमध्ये पाठीत सुरा खुपसला जात असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला होता. तर त्यांनी अनेक वेळा काँग्रेस स्वबळावर लढाणार असल्याचे सांगितले आहे. त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पटोले यांना टोला लगावला आहे. नाना पटोले यांच्यासारखी माणसे लहान आहेत, त्यांच्या वक्तव्यावर मी भाष्य करणार नाही, असे पवार म्हणाले. (Sharad Pawar said about Congress state president Nana Patole) 

हेही वाचा : डॅा. भारती पवारांच्या राज्यमंत्रीपदामागे भाजपचा आहे 'हा' मनसुबा!

शरद पवार बारामती येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करत, महाविकास आघाडीमध्ये पाठीत सुरा खुपसला जात आहे. असे म्हटले होते. त्या विषयी पवार यांना विचारले असता, पवार म्हणाले, या गोष्टीत मी पडत नाही. ती लहान माणसे आहेत त्यांच्यावर मी कशाला बोलू? जर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी काही बोलल्या असत्या तर मी बोललो असतो. असे म्हणत पवार यांनी नाना पटोले यांना टोला लगावला.

लोणावळ्यातील मेळाव्यात बोलताना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला होता. ठाकरेंनी स्वबळाचा नारा दिलेला चालतो, मग मी बोललेले का खुपते? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. पुण्याचे पालकमंत्री आपले काम करत नाहीत. त्यामुळे पुढील पुण्यातील पालकमंत्री आपलाच होईल, अशी शपथ घ्या, असे ते म्हणाले होते. आपण काही बोलायचे नाही, पण तो त्रास आपली ताकद बनवा. मी स्वबळावर म्हणालो होतो, यावर मी माघार घेणार नाही. आपला माणूस खूर्चीवर बसायला हवा, असे नाना पटोले म्हणाले होते. 

हेही वाचा : आम्ही काका-पुतण्यांच्या ताटाखालचे मांजर नाही: काँग्रेस नेत्याची पवारांवर कडवट टीका 

केंद्र सरकाने 'सहकार' मंत्रालयाची नव्याने निर्मिती करण्याच्या निर्णयाचा महाराष्ट्रातील सहकार चवळीवर कोणताही परिणाम होणार नाही. महाराष्ट्राच्या विधानसभेने सहाकरी कायदे केलेले असल्याने त्या कायद्यात केंद्राला हस्तक्षेप करता येत नाही. त्यामुळे केंद्र महाराष्ट्रातील सहकार चळवळीवर काही गडांतर आणेल, या ज्या काही बातम्या येतात, माझ्या मते याला काही अर्थ नाही. केंद्रात १० वर्षे सहकार खाते माझ्याकडे होते. त्यामुळे केंद्र सरकारने नव्याने सहकाराबाबत जो निर्णय घेतला आहे, यात काही नविन असे नाही, असेही पवार यांनी सांगितले. 

Edited By - Amol Jaybhaye 
 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख