खुद्द पवारही म्हणाले, ``ईडी नावाची यंत्रणा कोणाच्या मागे कशी लागेल, हे सांगता येत नाही..``

काळ बदलेल तेव्हा दुरूस्ती करू, असा सूचक इशारा पवार यांनी दिला.
sharad pawar-narendra modi
sharad pawar-narendra modi

पुणे : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केंद्र सरकारची यंत्रणा असलेल्या अंमलबजावणी संचालनालयाला (ED) आज लक्ष्य करत या ईडीचा वापर विरोधकांना नाऊमेद करण्यासाठी सुरू असल्याचा आरोप केला. पुण्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली.

ते  म्हणाले,``संस्थांच्या गैरव्यवहारांवर नियंत्रण ठेवण्याचे काम ईडी या संस्थेच्या माध्यमातून होते. मात्र मागील काही वर्षांपासून ईडीची नवीन यंत्रणा लोकांच्या परिचयात आली आहे. ईडीचा एक साधन म्हणून वापर करून विरोधकांना नाउमेद करण्याचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रात इतक्या वर्षात एवढ्या मोठ्या प्रमाणावर ईडीच्या केसेस ऐकिवात नव्हत्या. एकनाथ खडसे, अनिल देशमुख, प्रताप सरनाईक, भावना गवळी अशा अनेक नेत्यांवर ईडीची चौकशी लावण्यात आली आहे. त्यामुळे ही यंत्रणा कोणाच्या मागे कशी लागेल हे सांगता येत नाही, असेही पवार म्हणाले. काळ येतो आणि नंतर जातो सुद्धा.  हा काळ जाईल तेव्हा यात दुरुस्ती होईल, असा सूचक इशारा  पवार यांनी दिला.

संस्थेमध्ये गैरव्यवहार झाले असल्यास त्याची तक्रार संबंधित विभागाच्या ठराविक संस्थांकडे करता येते. असे असतानाही ईडी त्याठिकाणी जाऊन संबंधित संस्थांमध्ये हस्तक्षेप करत आहे. त्यामुळे राज्याच्या अधिकारांवर एक प्रकारे गदा येत आहे. या गोष्टी योग्य वाटत नसून पुढील अधिवेशनात हा विषय एकत्रितपणे मांडण्याचा आम्ही प्रयत्न करू, असे त्यांनी यावर सांगितले.

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन जास्त गर्दी होईल असे कार्यक्रम न करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे ते योग्यच आहे.  मीदेखील हजारोंच्या संख्येने गर्दी होईल अशा कार्यक्रमांना जाणार नाही. कोरोना संबंधीची सर्व काळजी घेतली असेल अशाच कार्यक्रमांना उपस्थिती लावेल, असे पवार म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनाची आपण दखल घेतली नाही तर कोरोनाच्या संभाव्य लाटेत आपल्याला मोठी किंमत द्यावी लागेल अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली. 

दरम्यान, सरसंघचालक मोहन भागवत यांनी भारतात राहणाऱ्या हिंदू व मुस्लिम समाजाचे पूर्वज एकच असल्याचे मत मांडले आहे.  त्यावर प्रतिक्रिया देताना हिंदू-मुस्लीम समाजाचा मूळ जन्म एका कुटुंबातून झाला आहे, त्यांचे विधान वाचून माझ्याही ज्ञानात भर पडली आहे, असा टोला पवार यांनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com