पंढपुरात वेगवान घडामोडी : अजितदादा समर्थक आमदाराची भाजप खासदार निंबाळकरांनी घेतली भेट

भारतीय जनता पक्षाने आमदार संजय शिंदे यांनाच आता गळाला लावण्याची तयारी सुरू केली आहे की काय, अशी चर्चा आता रंगली आहे.
Secret meeting between BJP MP Ranjit Singh Nimbalkar and MLA Sanjay Shinde
Secret meeting between BJP MP Ranjit Singh Nimbalkar and MLA Sanjay Shinde

पंढरपूर : उन्हाच्या वाढत्या पाऱ्याबरेाबर पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीतील राजकीय वातावरणही आता चांगलेच तापू  लागले आहे. पोटनिवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्यासपीठावर वावरणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समर्थक आमदार संजय मामा शिंदे आणि भारतीय जनता पक्षाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची आज कल्याण काळे यांच्या समवेत गुप्त बैठक झाली. या भेटीनंतर पंढरपूरच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगिरथ भालके यांच्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्यासह अनेक नेते तळ ठोकून आहेत. तर दुसरीकडे भाजप खासदार रणजितसिंह निंबाळकर व बाळा भेगडे यांनीही भाजपच्या विजयासाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे.

मागील दोन दिवसांपासून अजित पवार यांचे कट्टर समर्थक असलेले करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारात सहभागी झाले होते. तसेच, जयंत पाटील आणि कल्याणराव काळे यांची गुप्त बैठक घेण्यासाठी प्रयत्न केल्याची चर्चा असतानाच भारतीय जनता पक्षाने आमदार संजय शिंदे यांनाच आता गळाला लावण्याची तयारी सुरू केली आहे की काय, अशी चर्चा आता रंगली आहे. 

याचदरम्यान सोमवारी (ता. ५ एप्रिल) भाजप खासदार रणजितसिंह निंबाळकर आणि आमदार संजय शिंदे यांच्यात गुप्त बैठक झाली. विशेष म्हणजे ही बैठक कल्याणराव काळे यांच्या उपस्थितीत झाल्याने चर्चांना उधाण आले आहे. या दोन नेत्यांमध्ये झालेल्या गुप्त बैठकीचा तपशील मात्र समजू शकला नाही.

पंढरपूरची पोटनिवडणूक महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पक्षाने प्रतिष्ठेची केली आहे. भाजपचे सोलापूर जिल्हा प्रभारी, माजी मंत्री संजय ऊर्फ बाळा भेगडे यांनी ही स्वतंत्र यंत्रणा कामाला लावली आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात उत्साह वाढला आहे.

हेही वाचा : भाजप नेत्यांचा कोणता निरोप घेऊन खासदार निंबाळकर कल्याण काळेंना भेटले

पंढरपूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असलेले भारतीय जनता पक्षाचे नेते कल्याण काळे यांची सोमवारी (ता. ५ एप्रिल) माढ्याचे भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी भेटी घेतली. पंढरपूर पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेटी महत्वाची मानली जात आहे. भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचा कोणता मेसेज घेऊन खासदार निंबाळकर हे काळे यांना भेटले, अशी चर्चा या भेटीच्या निमित्ताने होत आहे.   

पंढरपूर पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याण काळे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त गेल्या दोन दिवसांपासून येत आहे. एकीकडे काळे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या बातम्या येत असताना माढा मतदारसंघाचे भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सोमवारी कल्याण काळे यांची पंढरपुरात येऊन भेट घेतली. 

काळे यांच्या संपर्क कार्यालयात या दोघांमध्ये भेट होऊन चर्चा झाली. चर्चेचा तपशील मिळू शकला नसला तरी काळे यांच्या भाजप सोडण्यावर मात्र नक्की चर्चा झाली असणार. काळे यांनी भारतीय जनता पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याने पक्षासाठी तो एक मोठा धक्का समजला जात आहे. पोटनिवडणूक सुरू असताना असा धक्का पक्षाला बसू नये, यासाठी भाजपच्या कोणत्या वरिष्ठ नेत्यांचा मेसेज घेऊन माढ्याचे खासदार काळे यांच्या भेटीला आले होते, असा सवाल विचारला जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com