Breaking पुण्यातील शाळा, महाविद्यालये १४ मार्चपर्यंत बंदच!

शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस १४ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. रात्रीचे संचार निर्बंधही कायम राहणार असल्याची माहिती मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे
Corona
Corona

पुणे : शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस १४ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.  रात्रीचे संचार निर्बंधही कायम राहणार असल्याची माहिती मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. पुण्यात २३ फेब्रुवारीपासून रात्रीचे संचार निर्बंध लागू करण्यात आले आहे. हे निर्बंधही आता १४ मार्च पर्यंत वाढविण्यात आले आहेत. 

पुणे शहर कोरोनामुक्त झाल्याचे समजून बिनधास्त वावरणाऱ्या पुणेकरांसाठी फेब्रुवारी महिना अलर्ट देणारा ठरला आहे. मागील काही दिवसांत कोरोना रुग्णांमध्ये होणारी वाढ तेच दर्शविते. पुण्यात २८ नोव्हेंबर ५२८ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर रुग्णसंख्येत कमालीची घट होत गेली. दैनंदिन रुग्णसंख्या २०० ते ३०० च्या जवळपास होती. जानेवारी महिन्यात सुरूवातीचे काही दिवस हा आकडा ३०० ते ४०० वर पोहचला. पण नंतर पुन्हा त्यात घट होऊन १५० ते २५० पर्यंत स्थिरावला. या कालावधीतील पॉझिटिव्हिटी रेटही १० टक्क्यांच्या खाली राहिला. मृतांचा आकडाही कमी झाला. १० फेब्रुवारीनंतर रुग्णसंख्येत अचानक वाढ होताना दिसून आली आहे.

रुग्णसंख्या कमी होत गेल्यानंतर प्रशासनाने लॉकडाऊनचे निर्बंध कमी करत नेले. हॉटेल, शाळा, महाविद्यालये सुरू झाली. मंदीरे उघडण्यात आली. काही उद्यानेही खुली करण्यात आली. लग्न समारंभ, विविध कार्यक्रमांना परवानगी मिळाली. प्रशासनाने याठिकाणांवर गर्दी न करण्याची, मास्क वापरण्याची अट घातली आहे. पण या नियमांचे पालनच होताना दिसत नाही. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसमधील प्रवाशांची तोबा गर्दी असते. अनेक जण मास्क न लावता बिनदिक्कतपणे फिरताना दिसतात. कोरोनाच्या नियमांबाबत निष्काळजीपणामुळेच कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. 
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com