शरद पवारांकडून उजनीच्या पाण्याबाबतचा शब्द घेऊनच संजय शिंदेंनी सिल्व्हर ओक सोडले

आदेश घेऊनच सोलापूरला यायचे, असे ठरवून सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते मुंबईत तळ ठोकून आहेत.
Sanjay Shinde released Silver Oak after taking a word from Sharad Pawar about Ujani water
Sanjay Shinde released Silver Oak after taking a word from Sharad Pawar about Ujani water

सोलापूर  ः इंदापूर (Indapur) तालुक्‍यासाठी उजनी धरणातून (Ujani dam) पाच टीएमसी पाणी देण्याच्या सर्वेक्षणाचा निर्णय झाला आणि सोलापूर (Solapur) जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस (Nationalist Congress) आणि पालकमंत्री दत्तात्रेय भरणे (Guardian Minister Dattatreya bharane) यांच्या विरोधात संतापाची ठिणगी पडली. संतापाच्या ठिणगीचा दिवसागणिक वणवा होण्याची भीती निर्माण झाली.

उजनी पाणी बचाव संघर्ष समितीने आंदोलनाच्या माध्यमातून तर करमाळ्याचे अपक्ष आमदार संजय शिंदे (MLA Sanjay Shinde) यांनी पाच टीएमसी पाण्याचा आदेश रद्द करण्यासाठी मंत्रालय स्तरावर महत्त्वाची भूमिका बजावली. ज्येष्ठ नेते शरद पवार, (Sharad Pawar) उपमुख्यमंत्री अजित पवार, (Ajit Pawar) जलसंपदामंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांच्याकडे आमदार शिंदे यांनी सोमवारी (ता. १७ मे) आणि मंगळवारी (ता.१८ मे) दोन दिवस पिच्छा पुरवला आणि सर्वेक्षणाचा आदेश जयंत पाटील यांनी रद्द करत असल्याची घोषणा केली. (Sanjay Shinde released Silver Oak after taking a word from Sharad Pawar about Ujani water)

आमदार संजय शिंदे यांनी या दोन्ही दिवशी तब्बल दोन दोन तास अजित पवार यांच्यासमोर उभे राहून सोलापूर जिल्ह्यावर होत असलेल्या अन्यायाचा पाढा वाचून दाखवला. हा पाढा वाचून दाखवत असतानाच गेल्या तीन वर्षांत भीमा नदीत येणारे सांडपाणी, दौंड येथील गेस मीटरवर मोजले जाणारे सांडपाणी यांची भक्कम कागदपत्रे आमदार शिंदे यांनी सोबत घेतली होती. नोव्हेंबरनंतर उजनीत एक टिपकाही सांडपाणी येत नसल्याचा महत्वाचा पुरावासोबत होता. महत्वाचे पुरावे, सोलापूर जिल्ह्यात होत असलेली आंदोलने याची दखल उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घ्यावी लागली. मुंबईत आलेल्या तौक्ते वादळामुळे सोमवारी मुंबईत हाय अलर्ट देण्यात आला होता. हाय अलर्टमुळे अजित पवारांकडे भेटायला येणाऱ्या माणसांची वर्दळ तशी कमीच होती. वादळाच्या या संधीचा फायदा आमदार शिंदे यांनी घेतला.

उजनीच्या पाच टीएमसी पाण्याचा आदेश रद्द करण्यासाठी मिळेल तेवढा वेळ त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे घालवला. मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता आमदार संजय शिंदे यांनी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार यांचीही सिल्व्हर ओक या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. सोलापूर जिल्ह्यावर होणारा अन्याय आणि उजनीत सांडपाणी येत नसल्याचे पुरावे त्यांनी शरद पवार यांनाही दाखविले.

तब्बल अर्धा तास उजनीचे पाणी, कारखानदारी यावर शरद पवार आणि आमदार संजय शिंदे यांच्यात चर्चा झाली. उजनीतून पाणी नेण्याचा आदेश रद्द करावा, याबाबत मी स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याशी बोलतो, असे आश्वासन घेतल्यानंतरच आमदार संजय शिंदे यांनी सिल्व्हर ओक सोडले. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वळविला.
 
सह्याद्री अतिथीगृहावर मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यानंतर तेथून जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची मंत्रालयात भेट घेतली. दरम्यान, आमदार यशवंत माने, माजी आमदार दीपक साळुंखे, माळशिरस राष्ट्रवादीचे नेते उत्तम जानकर, पंढरपूरचे नेते कल्याणराव काळे आणि सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष उमेश पाटील हे देखील मंत्रालयात दाखल झाले. आम्हाला निर्णय द्या, त्याशिवाय आम्ही सोलापूरला जाणार नाही, अशी भूमिका सोलापूरच्या नेत्यांनी घेतली. 

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी उजनीच्या पाणी प्रश्नावर जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची तब्बल चार ते साडेचार तास बैठक घेतली. या बैठकीनंतर सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत त्यांनी पंधरा ते वीस मिनिटांची बैठक घेतली. सोलापूरच्या नेत्यांची आग्रही मागणी व आक्रमक भूमिका पाहून जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मंगळवारी सायंकळी उजनीतून इंदापूरला पाच टीएमसी पाणी देण्याचा आदेश रद्द करत असल्याचे प्रसार माध्यमांसमोर सांगितले. 

गेल्या जवळपास एक महिन्यापासून सोलापूर जिल्ह्यात पेटत असलेल्या पाणीचोरीचा मुद्दा काल सायंकाळनंतर शांत होताना दिसत होता. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी प्रसार माध्यमांसमोर याबाबतची घोषणा केली असली तरीही पाणी रद्द झाल्याचा आदेश निघेपर्यंत आपण मुंबई सोडायची नाही. आदेश घेऊनच सोलापूरला यायचे, असे ठरवून सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते मुंबईत तळ ठोकून आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com