संजय राऊत म्हणाले, ‘आमचे प्रिय आमदार दिलीप मोहिते...’

पण, संयोजकांनी काळजी घेऊन राऊत आाणि आढळराव पाटील यांना व्यासपीठावर पूर्व दिशेला, तर मोहिते यांना पश्चिमेला बसवले होते.
Sanjay Raut said, "Our dear MLA Dilip Mohite
Sanjay Raut said, "Our dear MLA Dilip Mohite

मंचर (जि. पुणे) : खेड पंचायत समिती सभापतीवरील अविश्वास ठरावावरून एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोपाच्या तोफा डागलेले शिवसेनेचे राष्ट्रीय प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खेडचे आमदार दिलीप मोहिते  हे प्रथमच आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे रविवारी (ता. ५ सप्टेंबर) एकत्र आले होते. निमित्त होते लोकनेते (स्व.) माजी खासदार किसनराव बाणखेले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण समारंभाचे. मोहितेंना एरवी तिखट बोलणाऱ्या राऊतांनी या कार्यक्रमात मात्र मोहितेंचा उल्लेख ‘आमचे प्रिय आमदार दिलीप मोहिते...’ असा केला आणि उपस्थितांमध्ये टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. या वेळी ज्येष्ठ नेते शरद पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनाही हसू आवरले नाही. (Sanjay Raut said, "Our dear MLA Dilip Mohite ...)

मंचर येथील समारंभात महाविकास आघाडीचे दिग्गज नेते उपस्थित होते. खेड पंचायत समितीच्या सभापतीविरोधातील अविश्वास ठरावाच्या राजकारणावरून गेली दोन महिने आढळराव पाटील व मोहिते यांच्यामध्ये खडाजंगी झाली आहे. तसेच, महिनाभरापूर्वी राजगुरुनगर येथे संजय राऊत यांनी दिलीप मोहिते यांच्यावर शेलक्या शब्दांत टीकास्त्र सोडले होते. मोहिते यांनीही ‘राऊत यांना पंतप्रधान मोदीसाहेबही घाबरतात. त्यांच्यापुढे मी कोण,’ अशी उपहासात्मक टीका केली होती. 

खेड तालुक्यातील राजगुरुनगर येथे शनिवारी (ता. ४ सप्टेंबर) झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यातही संजय राऊत यांनी मोहिते यांच्यावर हल्लाबोल केला होता. ही घटना ताजी असतानाच आज मंचर येथे लोकनेते बाणखेले यांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी राऊत, आढळराव आणि मोहिते एका व्यासपीठावर एकत्र आले होते. पण, संयोजकांनी काळजी घेऊन राऊत आाणि आढळराव पाटील यांना व्यासपीठावर पूर्व दिशेला, तर मोहिते यांना पश्चिमेला बसवले होते. 

खासदार राऊत आणि आमदार मोहिते यांनी एकमेकांकडे पाहणेही कटाक्षाने टाळले होते. ही बाब उपस्थितांच्या नजरेत भरत होती. संजय राऊत बोलण्यासाठी उभे राहिल्यानंतर त्यांनी आमदार दिलीप मोहिते यांचे नाव घेताच उपस्थितांत हशा पिकला. उपस्थितांचा प्रतिसाद पाहून प्रिय आमदार दिलीप मोहिते असा त्यांनी दुसऱ्यांदा उच्चार केल्यानंतर उपस्थितांमध्ये टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com