पुण्यात ओबीसी मोर्चा दरम्यान माजी खासदार समीर भुजबळ यांना अटक - Samir Bhujbal Arrested in Pune while Taking OBC Morcha | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार म्हणतात, "मला वाटतं मुख्यमंत्री व्हावं, कुणी करणार का.."
धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराची तक्रार मागे

पुण्यात ओबीसी मोर्चा दरम्यान माजी खासदार समीर भुजबळ यांना अटक

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 3 डिसेंबर 2020

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा पूर्णपणे पाठींबा आहे. मात्र मराठा समाजाला आरक्षण देतांना ओबीसी आरक्षणाला धक्का लावण्यात येऊ नये. त्यामुळे ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी राज्य सरकारने उच्च व सर्वोच्च न्यायालयात वकील नियुक्त करणे यासह विविध मागण्यासाठी आज  शनिवारवाडा ते पुणे जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा आयोजित करण्यात आला होता

पुणे : मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये, या मागणीसाठी आज माजी खासदार समीर भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. या  मोर्चाला पुढे जाण्यासाठी पोलिसांकडून मज्जाव केल्याने समीर भुजबळ यांच्यासह ओबीसी बांधवांनी यांनी शनिवारी वाडा परिसरातील रस्त्यावर ठाण मांडत ठिय्या मांडत आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी समीर भुजबळ यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना अटक केली. 

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा पूर्णपणे पाठींबा आहे. मात्र मराठा समाजाला आरक्षण देतांना ओबीसी आरक्षणाला धक्का लावण्यात येऊ नये. त्यामुळे ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी राज्य सरकारने उच्च व सर्वोच्च न्यायालयात वकील नियुक्त करणे यासह विविध मागण्यासाठी आज  शनिवारवाडा ते पुणे जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. या मोर्चाचे नेतृत्व माजी खासदार समीर भुजबळ यांनी केले.

यावेळी उठ ओबीसी जागा हो समतेचा धागा हो, जय समता जय संविधान, बोल ओबीसी हल्लाबोल अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. आंदोलनादरम्यान समीर भुजबळ यांच्यासह ओबीसी बांधवाना पोलिसांकडून अटक करण्यात आली.त्यानंतर त्यांना फरास खाना विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे नेण्यात आले.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख