मद्यपींनी 30 कोटी लिटर रिचवून दिला राज्याला 8 हजार कोटींचा आधार 

पूर्वीच्या तुलनेत बियर विक्रीत सुमारे 50 टक्के घट झाली आहे.
Revenue of Rs 8,000 crore from liquor sales to the state in seven months
Revenue of Rs 8,000 crore from liquor sales to the state in seven months

पुणे : लॉकडाउनच्या मध्यापासून सुरू करण्यात आलेली दारूविक्री आणि त्यातून मिळणारा महसूल आता नियमित झाला आहे. गेल्या सात महिन्यांत सुमारे 29 कोटी लिटर दारुची विक्री झाली आहे. या विक्रीतून 7 हजार 807 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. वार्षिक उद्दिष्टाच्या 40.61 टक्के महसूल मिळाला आहे. 

राज्यात सध्या देशी, विदेशी दारू आणि वाईनची विक्री पूर्ववत सुरू झाली आहे. बियरची विक्री अद्यापही कमीच आहे. पूर्वीच्या तुलनेत बियर विक्रीत सुमारे 50 टक्के घट झाली आहे. 

गेल्या तीन महिन्यांपासून म्हणजेच सप्टेंबर, ऑक्‍टोबर आणि नोव्हेंबर या तीन महिन्यांत दारुची विक्री नियमित झाली आहे. त्यामुळे त्यातून मिळणारा महसूलही पूर्ववत झाला आहे. या तीन महिन्यांत सुमारे 18 कोटी लिटर दारूची विक्री झाली आहे. 

लॉकडाऊनमुळे मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांतील काही दिवस दारू विक्रीची दुकाने बंद होती. मात्र, मे महिन्याच्या मध्यापासून ही दुकाने सुरू झाली आहेत. राज्यात दरमहा सरासरी सव्वासात कोटी लिटर दारुची विक्री होत असते. यानुसार वर्षात सुमारे 87 कोटी लिटर दारूची विक्री होत असते. 

दारु विक्रीतून मिळणाऱ्या महसूलाचे चालू आर्थिक वर्षातील वार्षिक उद्दिष्ट 19 हजार 225 कोटी रुपयांचे आहे. यापैकी 30 नोव्हेंबरपर्यंत 7 हजार 807 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. गेल्या आर्थिक वर्षात हेच उद्दिष्ट 17 हजार 977 कोटी रुपयांचे होते. प्रत्यक्षात 15 हजार 419 कोटी रूपयांचे उत्पन्न मिळाले होते, असे राज्याचे उत्पादन शुल्क आयुक्त कांतिलाल उमाप यांनी सांगितले. 

राज्यात देशी, विदेशी दारू आणि वाइनची विक्री मागील तीन महिन्यांपासून पूर्ववत सुरू झाली आहे. बियरची विक्री अजूनही पूर्ववत झालेली नाही. येत्या मार्चपासून बिअरची विक्रीही पूर्ववत होईल, अशी अपेक्षा आहे. 

- कांतीलाल उमाप, उत्पादन शुल्क आयुक्त, राज्य 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com